पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लॉक’ का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:12 AM2021-08-17T04:12:26+5:302021-08-17T04:12:26+5:30

नागपूर : कोरोनामुळे रेल्वेगाड्या ठप्प झाल्या होत्या. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. कोरोनाची दुसरी लाटही ओसरली आहे. ...

Why are passenger trains still 'locked'? | पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लॉक’ का ?

पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लॉक’ का ?

googlenewsNext

नागपूर : कोरोनामुळे रेल्वेगाड्या ठप्प झाल्या होत्या. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. कोरोनाची दुसरी लाटही ओसरली आहे. नियमित रेल्वेगाड्या आणि पॅसेंजर सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे; परंतु रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. विशेष रेल्वेगाड्यातही प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यामुळे पॅसेंजर रेल्वेगाड्या अद्यापही ‘लॉक’ का, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत.

सध्या सुरू असलेल्या विशेष रेल्वेगाड्या

अ) ०२१०६ गोंदिया-मुंबई-विदर्भ विशेष रेल्वेगाडी

ब) ०२१३६ नागपूर-पुणे विशेष रेल्वेगाडी

क) ०२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम विशेष रेल्वेगाडी

ड) ०२२९० नागपूर-मुंबई दुरांतो विशेष रेल्वेगाडी

इ) ०१०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र विशेष रेल्वेगाडी

बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वेगाड्या

अ) नागपूर-भुसावळ पॅसेंजर

ब) नागपूर-आमला पॅसेंजर

क) इतवारी-टाटानगर पॅसेंजर

ड) नागपूर-काजीपेठ पॅसेंजर

इ) नागपूर-इटारसी पॅसेंजर

एक्स्प्रेसचा प्रवास महागडा

‘रेल्वेने कोरोनामुळे नियमित रेल्वेगाड्या बंद केल्या; परंतु विशेष रेल्वेगाड्यात प्रवाशांना १०० ते २०० रुपये अधिक प्रवासभाडे द्यावे लागते. त्यामुळे एक्स्प्रेसचा प्रवास परवडत नसल्याने रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू कराव्यात.’

-सूरज टेंभुर्णे, प्रवासी

विशेष रेल्वेगाड्यांचे तिकीट परवडत नाही

‘कोरोनामुळे रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत; परंतु या विशेष रेल्वेगाड्यातही प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे पॅसेंजर गाड्यातच गर्दी होते ही चुकीची कल्पना आहे. विशेष रेल्वेगाड्यांचे तिकीट परवडत नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू कराव्यात.’

-सचिन बोभाटे, प्रवासी

पॅसेंजर गाड्या सुरू करणे धोरणात्मक निर्णय

‘कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पॅसेंजर गाड्या बंद करून विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करणे हा धोरणात्मक निर्णय आहे. रेल्वे मुख्यालयाकडून आदेश आल्यानंतर पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्यात येतील.’

-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे नागपूर विभाग

..........

Web Title: Why are passenger trains still 'locked'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.