लोकसंख्येनुसार १७० वॉर्ड का नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:11 AM2021-08-29T04:11:48+5:302021-08-29T04:11:48+5:30

निडणुकीसाठी इच्छुकांना पडला प्रश्न : दहा वर्षांत ५ लाख लोकसंख्या वाढली लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : २०२२ मध्ये ...

Why aren't there 170 wards in terms of population? | लोकसंख्येनुसार १७० वॉर्ड का नाहीत?

लोकसंख्येनुसार १७० वॉर्ड का नाहीत?

googlenewsNext

निडणुकीसाठी इच्छुकांना पडला प्रश्न : दहा वर्षांत ५ लाख लोकसंख्या वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : २०२२ मध्ये होणारी महापालिका निवडणूक वॉर्ड पद्धतीने होणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार प्रारूप वॉर्डरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. वर्ष २०१७ ची निवडणूकही २०११ च्या जनगणनेनुसार झाली होती. वास्तविक मागील दहा वर्षांत नागपूर शहरातील लोकसंख्या ५ लाखांनी वाढली आहे. याचा विचार करता २०२२ मध्ये १७० वॉर्ड असायला हवेत.

२०११ च्या जनगणनेनुसार नागपूर शहराची लोकसंख्या २२ लाख आहे, तर २०१७ च्या निवडणुकीत शहराची लोकसंख्या २४ लाख, ४७ हजार, ४९४ गृहीत धरून ६५ ते ७० हजार लोकसंख्येचा चार सदस्यीय प्रभागात निर्माण करण्यात आला होता. त्यावेळी प्रथमच हुडकेश्वर, नरसाळा भागाचा समावेश महापालिकेत करण्यात आला.

चारसदस्यीय प्रभागातील लोकसंख्या गृहीत धरता एका वॉर्डाची लोकसंख्या १६ ते १८ होते; परंतु गेल्या पाच वर्षांत लोकसंख्या पुन्हा वाढली. ती आता २७ लाखांवर गेली आहे. त्यानुसार २० वॉर्ड वाढावयास पाहिजेत; अन्यथा वॉर्डाची संख्या १५१ कायम ठेवल्यास प्रत्येक वॉर्ड हा २० ते २२ हजार लोकसंख्येचा राहण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने एकसदस्यीय वॉर्डरचनेनुसार प्रारूप वॉर्डरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. सर्वेक्षणानंतर समिती वॉर्डरचनेचा आराखडा तयार करणार आहे. मात्र, महापालिकेतील नगरसेवकांच्या संख्येनुसार १५१ वॉर्डांतील लोकसंख्या निश्चित करणार की, लोकसंख्या वाढल्याने वॉर्डांची संख्या वाढणार याबाबत बोलण्यात मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिला. नवीन वॉर्ड रचनेसोबतच आरक्षण सोडत काढली जाईल. मनपात १५१ सदस्य कायम राहिल्यास महिलांसाठी ७६ जागा राखीव राहतील.

....जोड आहे.....

Web Title: Why aren't there 170 wards in terms of population?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.