गोवा-उत्तर प्रदेशातील मंदिर प्रवेश बंदीवर भाजप गप्प का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:10 AM2021-08-13T04:10:24+5:302021-08-13T04:10:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ महाराष्ट्रच नव्हेतर, गोवा आणि उत्तर प्रदेशातही मंदिरांमध्ये प्रवेश बंदी आहे. मग ...

Why is BJP silent on temple entry ban in Goa-Uttar Pradesh? | गोवा-उत्तर प्रदेशातील मंदिर प्रवेश बंदीवर भाजप गप्प का?

गोवा-उत्तर प्रदेशातील मंदिर प्रवेश बंदीवर भाजप गप्प का?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ महाराष्ट्रच नव्हेतर, गोवा आणि उत्तर प्रदेशातही मंदिरांमध्ये प्रवेश बंदी आहे. मग तेथील मंदिर प्रवेश बंदीबाबत भाजप गप्प का, असा सवाल विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भाजपचे नाव न घेता उपस्थित केला. गुरुवारी नागपूर जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राज्यात मंदिर प्रवेश सुरू करावा, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी उपरोक्त सवाल केला.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मंदिर प्रवेश हा सध्या एकाच पक्षाचा प्रश्न आहे. मंदिरे उघडावीत असे आम्हालाही वाटते. परंतु कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून सरकार काळजी घेत आहे. मंदिरांमध्ये पूजा-अर्चना करताना संसर्ग होण्याची भीती आहे. सध्याची परिस्थिती पाहता अधिक विज्ञानवादी होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांनी कोरोना व लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारचे नियोजन योग्य नसल्याकडेही लक्ष वेधले. देशात जानेवारीमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली. त्यापूर्वी जगभरात डिसेंबरमध्येच लसीकरणाला सुरुवात झाली होती. सर्वांचे एकत्रित लसीकरण करता आले असते. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना बंदी घालता आली असती. व्हॅक्सिन डिप्लोमसी तेव्हा न करता आता करता आली असती, असे उदाहरणही त्यांनी दिले. यासोबतच कोरोनासारख्या महामारीशी पहिल्यांदाच सर्वांना सामना करावा लागला. केंद्र सरकारसाठीही ते नवीन असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. याप्रसंगी आ. आशिष जयस्वाल आणि आ. दुष्यंत चतुर्वेदी उपस्थित होते.

- संसद गुंडाळावी लागली हे योग्य नाही

संसदेमध्ये जो काही प्रकार घडला आणि त्यामुळे संसद गुंडाळावी लागली ते योग्य झाले नाही. संसदीय कामकाज योग्यपणे पार पाडण्यासाठी गटनेत्यांची बैठक घेतली जाते. त्यात दिवसभराचे कामकाज ठरविले जाते. गटनेत्यांना विश्वासात घेऊन जर कामकाज झाले तर असे प्रकार टाळता येतात, असे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी संसदेत घडलेल्या घटनेसंदर्भात सांगितले.

Web Title: Why is BJP silent on temple entry ban in Goa-Uttar Pradesh?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.