संमेलनासाठी दिल्लीने तेव्हा का नकार दिला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 06:21 AM2021-01-07T06:21:53+5:302021-01-07T06:22:10+5:30

कौतिकराव ठाले-पाटील यांचा सवाल

Why did Delhi then refuse to akhil bharatiy marathi sahitya sammelan? | संमेलनासाठी दिल्लीने तेव्हा का नकार दिला? 

संमेलनासाठी दिल्लीने तेव्हा का नकार दिला? 

Next

प्रवीण खापरे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावरून नाशिक विरुद्ध दिल्ली असा सामना रंगला आहे. दिल्लीसाठी आग्रह धरणाऱ्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी टोला लगावला आहे. दिल्लीला दिल्लीकर नाही तर पुणेकर संमेलन मागत आहेत, अशी टीका ठाले-पाटील यांनी केली आहे.   


९४ व्या साहित्य संमेलनाच्या नियोजित स्थळाबाबत संवैधानिक प्रक्रिया पार न पाडता, हेकेखोरपणा दाखविला जात असल्याचा आरोप साहित्य वर्तुळातून महामंडळाच्या अध्यक्षांवर लावला जात आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांना उत्तर दिले आहे. दोन वर्षांपूर्वी दिल्लीला संमेलन देण्यात आले होते. तेव्हा दिल्लीकरांनी पत्र पाठवून महामंडळाकडे आयोजनासंदर्भात नकार दर्शवला होता. जेव्हा दिले तेव्हा नकार दर्शवला आणि आता इतका अट्टहास का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीत संमेलनासाठी अडून बसलेले 
पुण्याचे संजय नहार हे चांगले मित्र आहेत. मात्र, दिल्लीकडून पुढाकार नसताना पुण्याच्या माणसाने हा आग्रह का धरावा, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

‘हे मोदी, गडकरींना 
खूश करण्यासाठीच!’

दिल्लीचा आग्रह धरून बसणारे हे मोदी व गडकरी यांच्या जवळचे 
आहेत. त्यांना खूश करण्यासाठीच हा सगळा कट असल्याचा गंभीर आरोपही ठाले-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. 

कोरोनापासून कोण संरक्षण करणार?
दिल्लीत कोरोनाचा प्रकोप संपता संपेना, अशी स्थिती आहे. त्यामुळे दिल्लीत संमेलनासाठी परवानगी कशी मिळेल, हा प्रश्न आहे. त्यातच संमेलनात सहभागी होण्यासाठी देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मराठी सारस्वत, साहित्य रसिक प्रवास करून येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेची खात्री दिल्ली देईल का?
- कौतिकराव ठाले-पाटील, 
अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

Web Title: Why did Delhi then refuse to akhil bharatiy marathi sahitya sammelan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.