‘एनएचएआय’ने का नाही केली १० लक्ष झाडांची लागवड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:07 AM2021-03-06T04:07:25+5:302021-03-06T04:07:25+5:30

नागपूर : अजनी येथे इंटर माॅडेल स्टेशन प्रकल्प साकारताना हाेणारी हजाराेंची वृक्षताेड भरून काढण्यासाठी पाचपट झाडे लावण्याचा दावा करणाऱ्या ...

Why didn't NHAI plant 10 lakh trees? | ‘एनएचएआय’ने का नाही केली १० लक्ष झाडांची लागवड?

‘एनएचएआय’ने का नाही केली १० लक्ष झाडांची लागवड?

Next

नागपूर : अजनी येथे इंटर माॅडेल स्टेशन प्रकल्प साकारताना हाेणारी हजाराेंची वृक्षताेड भरून काढण्यासाठी पाचपट झाडे लावण्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) दिव्याखाली किती अंधार आहे, हे त्यांच्या २० वर्षाच्या रेकाॅर्डवरून दिसून येत आहे. प्राधिकरणाच्या नागपूर विभागाअंतर्गत ९ जिल्ह्यामध्ये २००१ ते सप्टेंबर २०२० या काळात रस्ते तयार करताना दाेन लाखाच्या जवळपास झाडे ताेडली. त्या तुलनेत नियमानुसार १६ लाखाच्यावर झाडे लावण्याची हमी देणाऱ्या एनएचएआयने १० लक्ष ६७ हजार ३१४ झाडांची लागवडच केली नाही. विशेष म्हणजे लावलेली किती झाडे जगली याचा नागपूर वगळता कुठलाच रेकाॅर्ड एनएचएआयजवळ नाही.

माजी मानद वन्यजीव संरक्षक जयदीप दास यांनी आरटीआयद्वारे काढलेल्या माहितीतून हे धक्कादायक वास्तव समाेर आले आहे. एनएचएआयने २० वर्षांत नागपूर विभागाअंतर्गत नागपूर १ व २ सह वाशिम, नांदेड, यवतमाळ, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव व अमरावती या क्षेत्रांत २४५५.५२ किलाेमीटर रस्त्याचे बांधकाम केले. या कामादरम्यान विभागाने १ लाख ८४ हजार ३१७ झाडे कापून फेकली. पर्यावरण विभागाच्या जुन्या नियमानुसार महामार्ग तयार करताना हाेणाऱ्या वृक्षताेडीच्या तुलनेत प्रतिकिलाेमीटर ६६६ झाडे लावणे बंधनकारक आहे. (नव्या नियमानुसार १००० झाडे) यानुसार एनएचएआयला १६ लक्ष ३५ हजार ७१२ झाडांची लागवड करणे अपेक्षित हाेते व तसे आश्वासनही प्राधिकरणाने दिले हाेते. मात्र प्रत्यक्ष लागवड झाली केवळ ५ लाख ६८ हजार ३९८ झाडांची. आणखी एक वास्तव म्हणजे नागपूर क्षेत्रात ९६२९२ झाडे जगली असून इतर क्षेत्रात किती झाडे जगली याची माहिती उपलब्ध नसल्याचे एनएचएआयने सांगितले आहे.

क्षेत्र रस्ते (किमी) किती झाडे ताेडली किती लागवड नियमानुसार लागवड कमतरता

नागपूर-१ ३९३.५ ४८३७६ ८२४०१ २६२०७१ १७९६७०

नागपूर-२ १९७.६ ७१३१ १३१६५५ १५६४५४ २४७९९

वाशिम १७५ ६७१५ ० ११६५५० ११६५५०

नांदेड ३२३ १८८७७ ९२३५ २१५११८ २०५८८३

यवतमाळ २८५ १९४१६ १२४७१३ १८९८१० ६५०९७

औरंगाबाद २५५ १७२३० ११०१०२ १७००५२ ५९९५०

धुळे २९२.२ ११४६० ३६३०० १९४७३३ १५८४३३

जळगाव १५७.७५ १३४०७ ० १०५०६३ १०५०६३

अमरावती ३७६.३७ ४१७०५ ४९१९३ २५०६६० २०१४६७

एकूण २४५५.५२ १८४३१७ ५६८३९८ १६३५७१२ १०६७३१४

Web Title: Why didn't NHAI plant 10 lakh trees?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.