गोड बोलण्याची औपचारिकता कशाला? तसे वागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 10:12 AM2019-01-16T10:12:39+5:302019-01-16T10:35:16+5:30

मकरसंक्रांतीच्या शुभपर्वावर, त्याची दररोजच्या जीवनातील महती विशद करणारे हे नवे सदर. यात जीवनातील गोडवा हा कशात दडला आहे, याचा उलगडा करत आहेत, चंद्रशेखर बावनकुळे, उर्जा व उत्पादनशुल्क मंत्री, महाराष्ट्र राज्य.

Why do the formalities of sweet talk? Do it | गोड बोलण्याची औपचारिकता कशाला? तसे वागा

गोड बोलण्याची औपचारिकता कशाला? तसे वागा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
गोड बोलण्याची औपचारिकता मला आवडत नाही. हा माझ्या स्वभावातील दोष आहे. पण काम घेऊन आलेल्या निराश माणसाला मदत करून, त्याच्या संकटात धावून मी त्याला आनंदी करतो. ती उणीव मी अशी भरून काढतो. कुणी चुकून दुखावले तर त्याची लगेच जाणीव होते. मग मी त्याला बोलावूनही घेतो. माझ्या मनावरील दडपण असे दूर होते.
राडी मंदिराच्या परिसरात माझे बालपण गेले. तिथे मामाचे किराण्याचे दुकान होते. दुकानात मी काम करायचो. आजीला दूध विकायलाही मदत करीत असे. संध्याकाळ झाल्यानंतर मंदिरातील दिव्याखाली बसून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत राहायचो. मजुरी आणि शिक्षण हाच माझा त्यावेळचा दिनक्रम. इतरांसारखे बालपण मी अनुभवलेच नाही. कधी खेळलो नाही. इच्छा असूनही परिस्थितीमुळे दंगामस्ती करू शकलो नाही.
गरिबीने लहानपणीच मला शहाणे केले. मामाच्या दुकानात गिºहाईक यायचे. त्यांच्याशी गोड बोलत असल्याने सर्वांचा मी आवडता होतो. लोकांशी आपण चांगले वागलो की लोकही आपल्यावर प्रेम करतात ही शिकवण मला किराणा दुकानात आणि लोकांच्या घरी दूध वाटताना मिळाली.
पुढे अपघाताने राजकारणात आलो. कुटुंबात अशी कुठलीही पार्श्वभूमी नव्हती. पण पुढे यश मिळत गेले. त्याचे संपूर्ण श्रेय या लोकसंग्रहालाच आहे. ताणतणावाचे प्रसंग तसे जन्म झाल्यापासूनच. पण परिस्थितीमुळे येणारे ताणतणाव माणसाला खचवत नाहीत, उलट मजबूतच करतात. मीदेखील अशाच अनेक घटनांमधून शिकत गेलो. आॅटो चालवायचो, पुढे लग्न केले. दोन-तीन दिवस त्या आॅटोत संसारदेखील केला. लोक थट्टा करायचे, हिणवायचे. पण एक गोष्ट ठावूक होती की, यातून आपले सुखाचे दिवस येील. आमदारकी, पुढे मंत्रिपद हे राजकारणातील यश मिळाल्यानंतरही मला जुन्या दिवसांचा विसर पडू नये हीच गोष्ट मी परमेश्वराला एकच गोष्ट मागत असतो. लोक मला भेटलेले आवडतात. त्यांची कामे करताना समाधान मिळते. शक्यतोवर कुणाला नाराज करून पाठवत नाही. त्याचे काम होईपर्यंत मी अस्वस्थ असतो. त्याचे काम झाले की आनंद येतो. माझ्या मनावरील ताणतणावाचे मी असे नियोजन केले आहे. उद्याची चिंता मला खरंच भेडसावत नाही. कारण आपल्या बालपणाचा संघर्ष मी सतत आठवत असतो. हेवा, मत्सर, गटबाजी यासाठी वेळ मिळत नाही. कारण सतत कामात असतो.
 

Web Title: Why do the formalities of sweet talk? Do it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.