दहा रुपयांत चप्पल मिळते का हो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:17 AM2021-09-02T04:17:39+5:302021-09-02T04:17:39+5:30

नागपूर : महागाई आकाशाला गवसणी घालत असताना कोतवालांना मिळणारा चप्पल भत्ता केवळ १० रुपये आहे. त्यांच्या मानधनातही अनेक वर्षांपासून ...

Why do you get slippers for ten rupees? | दहा रुपयांत चप्पल मिळते का हो?

दहा रुपयांत चप्पल मिळते का हो?

googlenewsNext

नागपूर : महागाई आकाशाला गवसणी घालत असताना कोतवालांना मिळणारा चप्पल भत्ता केवळ १० रुपये आहे. त्यांच्या मानधनातही अनेक वर्षांपासून वाढ नाही. तुटपुंज्या मानधनात शासकीय कामाचे ओझे वाहणारा कोतवाल आजही उपेक्षित आहे.

गावपातळीवर महत्त्वाचा आणि जबाबदार घटक असलेल्या कोतवालांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. एकीकडे शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार आणि भत्ते वाढत असताना कोतवालांना जेमतेम ७ हजार रुपयांचे मानधन मिळते. त्यांच्या पदोन्नतीचा मुद्दाही बराच काळ प्रलंबित होता. अलिकडे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून पदोन्नती दिली जात आहे. जिल्ह्यातील अनेक कोतवाल पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. ...

जिल्ह्यात मंजूर कोतवालाची पदे - ४२६

रिक्त पदे - १५४

...

कोणत्या तालुक्यात किती?

तालुका : मंजूर पदे

नागपूर शहर : १९

नागपूर ग्रामीण : ३३

हिंगणा : ३३

मोहदा : ३३

कुही : ३७

सावनेर : ३२

कळमेश्वर : २६

काटोल : ३७

कामठी : २४

भिवापूर : २६

नरखेड : ३८

रामटेक : २६

पारशिवणी : २६

उमरेड : ३६

एकूण : ४२६

...

कामांची यादी भली मोठी

कोतवालांच्या कामाची यादी बरीच मोठी आहे. शेतसारा वसुली, उत्खननावर लक्ष ठेवणे, नैसर्गिक आपत्तीमध्ये लक्ष ठेवणे, नुकसानाची नोंद घेणे, घर पडल्यास, वीज पडल्यास शासनाला माहिती कळविणे, निवडणुकीची सर्व कामे करणे, या सोबतच तहसीलदारांच्या मौखिक आदेशावरून असलेल्या कामांची यादी पुन्हा वेगळीच असते.

...

२०१९ पासून पदोन्नती नाही

काही कोतवालांची पदोन्नती झाली आहे. आता नव्याने बिंदू नामावली तयार करण्याचे काम सुरू असून, येत्या एक-दोन महिन्यात यादी पूर्ण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी २०१९ मध्ये पदोन्नती मिळाली होती. आयुक्त कार्यालयातून याद्या प्रमाणित करून भरती प्रकिया होईल, असे सांगितले जाते.

...

अपुऱ्या मानधनात कसे भागणार?

१) महागाई वाढत आहे. मानधन अपुरे असले तरी ते वाढविण्याकडे सरकारचे लक्ष नाही. अपुऱ्या पैशावर घर चालविणे कठीण होत आहे.

- डेनी चावके, फेटरी, ता. नागपूर.

२) पदोन्नती आणि रिक्त पदांचा मुद्दा प्रलंबित आहे. महागाई भेडसावत असल्याने सरकारचे आमच्याकडे लक्ष देण्याची अपेक्षा आहे.

- मंगेश जांभुळकर, विहीरगाव, ता. नागपूर.

...

जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

कोतवालांच्याच मागण्या शासन स्तरावर प्रलंबित असून, पाठपुरावा सुरू आहे. रिक्त पदांच्या भरतीसाठी बिंदू नामावली तयार करण्याचे काम सुरू आहे.

- जगदिश काटकर, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी.

...

Web Title: Why do you get slippers for ten rupees?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.