मुलांना सांभाळणाऱ्या आजींची गायनिक टेस्ट कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:21 PM2019-01-21T23:21:06+5:302019-01-21T23:26:15+5:30

६० वर्षांच्या वरील अंगणवाडी सेविकांना सेवा देण्यासाठी शासनाने फिटनेस टेस्ट आवश्यक केली आहे. यासाठी त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून फिटनेसचे प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. यासाठी त्यांची गायनिक टेस्ट करण्यात येत आहे. या टेस्टवर अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी आक्षेप घेतला असून, ६० वर्षांच्या वयात महिला आजी होतात. आई-वडिलांपेक्षाही आजी मुलांना चांगल्याप्रकारे सांभाळू शकते. मग मुलांना सांभाळणाऱ्या आजींची गायनिक टेस्ट कशाला, असा सवाल अंगणवाडी कर्मचारी संघटनेने शासनाला केला आहे.

Why grandmother's gynaec test to handle children ? | मुलांना सांभाळणाऱ्या आजींची गायनिक टेस्ट कशाला?

मुलांना सांभाळणाऱ्या आजींची गायनिक टेस्ट कशाला?

Next
ठळक मुद्देअंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सवाल : फिटनेसच्या प्रमाणपत्रासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ६० वर्षांच्या वरील अंगणवाडी सेविकांना सेवा देण्यासाठी शासनाने फिटनेस टेस्ट आवश्यक केली आहे. यासाठी त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून फिटनेसचे प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. यासाठी त्यांची गायनिक टेस्ट करण्यात येत आहे. या टेस्टवर अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी आक्षेप घेतला असून, ६० वर्षांच्या वयात महिला आजी होतात. आई-वडिलांपेक्षाही आजी मुलांना चांगल्याप्रकारे सांभाळू शकते. मग मुलांना सांभाळणाऱ्या आजींची गायनिक टेस्ट कशाला, असा सवाल अंगणवाडी कर्मचारी संघटनेने शासनाला केला आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे ६५ वर्ष आहे. एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत जेव्हापासून अंगणवाड्या सुरू झाल्या, तेव्हापासून कधीही अंगणवाडी सेविकांकडून फिटनेस प्रमाणपत्र घेण्यात आले नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधन वाढीसाठी केलेल्या आंदोलनामुळे शासनाने त्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष केले. शासनाच्या या निर्णयाला परत संघटनांनी विरोध केल्यामुळे ६५ वय कायम ठेवण्यात आले. पण ६० वर्षानंतर त्यांच्याकडून फिटनेस प्रमाणपत्र मागण्यात आले. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे खेड्यापाड्यातून अंगणवाडी कर्मचारी फिटनेस प्रमाणपत्रासाठी मेयो व मेडिकल रुग्णालयात येत आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या या महिलांना प्रमाणपत्रासाठी किमान ८ ते १० दिवस लागत आहे. त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट करवून घेण्यात येत आहे. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यांना प्रकल्प कार्यालयाला द्यायचे आहे. फिटनेस प्रमाणपत्रासाठी वेळ लागत असल्यामुळे प्रकल्पस्तरावरील कार्यालयातील अधिकारी त्यांना सुटी घेण्यास सांगत आहे.
अंगणवाडीमध्ये शून्य ते सहा वयोगटाच्या मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण, पोषण आहार, गर्भवती मातांना सेवा पुरविणे, स्तनदा मातांना सेवा देण्याचे काम सेविका व मदतनीसांच्या माध्यमातून करण्यात येते. अंगणवाडीत कुठलेही अवजड उचलणे ठेवण्याचे काम नाही. मुलांचा सांभाळ करणे, हे मुख्य काम येथे होते.
 शासनाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची विडंबना 
शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केल्याची घोषणा केली, परंतु अद्यापही मानधनवाढ दिलेली नाही. अंगणवाड्यांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती बंद केली आहे. आजपर्र्यंत कधीही न झालेली फिटनेस टेस्ट ६० वर्षाच्या वरच्या कर्मचाऱ्यांना द्यावी लागत आहे. त्यासाठी त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे, वेळ आणि पैसाही खर्च होत आहे. त्यातच गायनिक टेस्ट करून शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांची विडंबना करीत आहे.
चंदा मेंढे, सचिव, अंगणवाडी कर्मचारी संघटना, सीटू,

Web Title: Why grandmother's gynaec test to handle children ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर