विदर्भात सर्वदूर पाऊस; भंडारा, गाेंदिया, चंद्रपूरला झाेडपले; २४ तास ऑरेंज अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2023 09:44 PM2023-06-27T21:44:01+5:302023-06-27T21:44:28+5:30

Nagpur News चार दिवसांपूर्वी सक्रिय झालेल्या पावसाने आता जाेर धरला आहे. भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर आणि गडचिराेली जिल्ह्याला साेमवारी रात्रभर पावसाने झाेडपले.

Widespread rain in Vidarbha; Trees are planted in Bhandara, Gandia, Chandrapur; 24 hours orange alert | विदर्भात सर्वदूर पाऊस; भंडारा, गाेंदिया, चंद्रपूरला झाेडपले; २४ तास ऑरेंज अलर्ट

विदर्भात सर्वदूर पाऊस; भंडारा, गाेंदिया, चंद्रपूरला झाेडपले; २४ तास ऑरेंज अलर्ट

googlenewsNext

नागपूर : चार दिवसांपूर्वी सक्रिय झालेल्या पावसाने आता जाेर धरला आहे. भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर आणि गडचिराेली जिल्ह्याला साेमवारी रात्रभर पावसाने झाेडपले. भंडाऱ्याच्या साकाेलीत १२ तासांत तब्बल २०२.४ मि.मी. पावसाची नाेंद झाली. गाेंदिया जिल्ह्यातही धुवांधार बरसल्याने पाच तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. याच जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यात नाल्याला आलेल्या पुरात एक अनोळखी व्यक्ती सायकलसह वाहून गेला. हवामान विभागाने पुन्हा २४ तास पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यानंतर पावसाचा जाेर काहीसा कमी हाेण्याची शक्यता आहे.

नागपुरात रात्रीपासून मंगळवारी सायंकाळपर्यंत २४ तासांत १६.१ मि.मी. पावसाची नाेंद झाली. जिल्ह्यात कुही तालुक्यात सर्वाधिक ४६.४ मि.मी. पाऊस झाला आहे. पावसाची रिपरिप मंगळवारी दिवसभरही चालली. पावसाचा सर्वाधिक जाेर भंडारा जिल्ह्यात दिसून आला. साकाेली तालुक्याला अक्षरश: पावसाने धाे-धाे धुतले. दुसरीकडे पवनी, लाखांदूर, लाखनी, तुमसर तालुक्यातही पावसाने थैमान घातले आहे. लगतच्या गाेंदिया जिल्ह्यालाही पावसाने चांगलेच झाेडपले. रात्रीपासून मंगळवारी दिवसभर काेसळधार सुरू हाेती. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातही पावसाने धुवांधार बॅटिंग केली. अकाेला व अमरावतीतही पावसाची रिमझिम सुरू होती.

पारा घसरला

सर्वत्र पावसाचा जाेर वाढल्याने दिवसाचे तापमान कमालीचे खाली घसरले आहे. नागपुरात २४ तासांत ४.७ अंशांनी घसरत २७.३ अंशांवर पाेहोचले. सरासरीपेक्षा ६.६ अंशांनी कमी झाले आहे. सर्वांत कमी बुलढाणा २५.२ व गडचिराेलीत २५.६ अंशांची नाेंद झाली. चंद्रपूर व ब्रम्हपुरीमध्ये तापमान सरासरीपेक्षा ८ व ७.४ अंशांनी घसरले व २६ अंशांवर पाेहोचले. अकाेला, वर्ध्यातही तापमान ६ अंशांनी घसरले.

गोंदिया जिल्हा : पाच तालुक्यांत १०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस

गोंदिया जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत एकूण सरासरी १०७.८ मि.मी. पाऊस पडल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण सरासरी १०७.८ मि.मी. पाऊस पडला. अर्जुनी मोरगावला १५३.६ मि.मी. तर सडक सालेकसाला १२७.४ मि.मी. अर्जुनीला १२४ मि.मी. पावसाची नोंद झाली. याशिवाय गोरेगाव, आमगाव, देवरी, तिरोडा, सडकअर्जुनी तालुक्यातही पावसाने थैमान घातले. संततधार पावसानंतर पुजारीटोला धरणाचे दोन दरवाजे उघडले.

भंडारा जिल्हा : साकोली तालुक्यात पावसाची धुवांधार बॅटिंग

जिल्ह्यात गत २४ तासांपासून संततधार पाऊस बरसत आहे. यामुळे जिल्ह्यात सरासरी ८० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. भंडारा, पवनी, लाखांदूर, साकोली व लाखनी पाच तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक पाऊस साकोली तालुक्यात बरसला. मुसळधार पावसामुळे लाखांदूर तालुक्यातील एक तर लाखनी तालुक्यातील चार घरांची अंशतः पडझड झाली तर जनावरांचा एक गोठा कोसळला.

चंद्रपूर, गडचिरोलीतही धो-धो

चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरीमध्ये धो-धो पाऊस झाला. रात्रभरात तब्बल ९१.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. गडचिरोली आरमाेरी या तालुक्यांमध्ये मंगळवारी पावसाने चांगलेच झाेडपून काढले. गडचिराेलीसह दक्षिणेकडील चामाेर्शी, मुलचेरा, सिराेंचा, अहेरी या तालुक्यांमध्ये मात्र पावसाची रिपरिप बुधवारी दिवसभर सुरू हाेती. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरीमध्ये पावसाने धुवांधार बॅटिंग केली. रात्रभरात तब्बल ९१.८ मि.मी. पावसाची नाेंद करण्यात आली. गडचिराेली शहरात रात्री १८.४ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यातील काेरची तालुक्यात १३६.७ मि.मी. पाऊस झाला. अकाेला व अमरावतीतही पावसाची रिमझिम चालली आहे.

अज्ञात व्यक्ती सायकलसह पुरात वाहून गेला

अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : तालुक्यातील अरततोंडी ते पिंपळगाव खांबीदरम्यानच्या नाल्याला आलेल्या पुरात मंगळवारी सकाळी एक अनोळखी व्यक्ती सायकलसह वाहून गेली. अद्याप शोधमोहीम सुरू आहे. त्या अज्ञात व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी प्रशासनातर्फे आजूबाजूच्या गावात दवंडी देण्यात आली आहे.

पिंपळगाव/खांबीच्या नाल्यावरच्या पुलावरून सोमवारी रात्रीपासून पाणी वाहत आहे. मंगळवारी सकाळी संबंधित इसम सायकल घेऊन पूल पार करत होता. याचदरम्यान तो नाल्यात वाहून गेला. काही प्रत्यक्षदर्शींनी याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला.

Web Title: Widespread rain in Vidarbha; Trees are planted in Bhandara, Gandia, Chandrapur; 24 hours orange alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस