‘लोकमत’च्या रक्तदान मोहिमेला व्यापक पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:07 AM2021-07-01T04:07:24+5:302021-07-01T04:07:24+5:30

(लोगो- लोकमत रक्ताचं नातं ) फोटो :- बाबूजींचा फोटो व बॉटमला शिबिराच्या प्रायोजकांचा लोगो वापरणे. लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर ...

Widespread support for Lokmat's blood donation drive | ‘लोकमत’च्या रक्तदान मोहिमेला व्यापक पाठबळ

‘लोकमत’च्या रक्तदान मोहिमेला व्यापक पाठबळ

googlenewsNext

(लोगो- लोकमत रक्ताचं नातं )

फोटो :- बाबूजींचा फोटो व बॉटमला शिबिराच्या प्रायोजकांचा लोगो वापरणे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोणत्याही कठीण प्रसंगात आठवतात, ती रक्ताची नाती. याच नात्यांची गुंफण आणखी विस्तारण्यासाठी आणि मानवतेच्या सागरात आपलेही अर्घ्य वाहण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला आहे. कोरोना संक्रमणकाळात आरोग्याच्या निर्बंधांमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, ही जाण ठेवत ‘लोकमत’च्या वतीने स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात २ ते १५ जुलैदरम्यान ‘लोकमत - रक्ताचं नातं’ या मोहिमेअंतर्गत महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे. उद्या, २ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता स्व. जवाहरलाल दर्डा कला अकादमी, लोकमत भवन, नागपूर येथे या मोहिमेचे उद्घाटन होईल. ‘लोकमत’च्या या मोहिमेला समाजातील सर्वच घटकांकडून पाठबळ मिळत आहे.

बाबूजींच्या जयंतीच्या पूर्वदिनी गुरुवारी नागपूर शहर व जिल्ह्यात चार ठिकाणी महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे.

आज येथे होणार रक्तदान

इंडियन मेडिकल असोसिएशन, उत्तर अंबाझरी मार्ग

- इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’च्या पर्वावर ‘लोकमत’च्या सहयोगाने रक्तदान शिबिराचे आयोजन आयएमए हाऊस, उत्तर अंबाझरी मार्ग येथे सकाळी ९ ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. रामक्रीष्ण लोंढे, आयएमए नागपूरचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, समन्वयक डॉ. प्रशांत राठी, डॉ. मुकेश वाघमारे, डॉ. आशिष खंडेलवाल, आयएमए नागपूरचे सचिव डॉ. सचिन गाथे उपस्थित राहतील. रक्तदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी डॉ. संजय देवतळे यांच्याशी ९८२३०८७५५४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

------------------

आयसीएआय भवन, धंतोली, नागपूर

- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाैंटंट्स ऑफ इंडियाची नागपूर शाखा डब्ल्यूआयआरसीच्या वतीने आज, गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आयसीएआयच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘लोकमत’च्या सहयोगाने हे शिबिर पार पडणार आहे. वरिष्ठ सीए दिलीप रोडी, शंभू टेकडीवाल, पी. सी. सारडा व हेमल कोठारी यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन होईल. यावेळी नागपूर शाखेचे अध्यक्ष साकेत बागडिया, सचिव संजय अग्रवाल, उपाध्यक्ष जितेन सागलानी, माजी अध्यक्ष किरीट कल्याणी, सुरेन दुरगकर, अमेय सोमन, अविरल बारंगे, करण अग्रवाल, राधिका तनेजा, रविना तायडे, पराग जैन, आदी उपस्थित राहतील. अध्यक्ष साकेत बागडिया यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदानाचे कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी ९३७३१२४५५५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

------------------

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर

- इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) निवासी डॉक्टरांची संघटना (मार्ड) यांच्यातर्फे मेयो येथे सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिर होईल. यात डॉक्टर मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन रक्तदान करतील.

--------------

स्व. देवरावजी ईटनकर आयटीआय, बुधवारी पेठ, उमरेड

- उमरेड नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष स्व. देवरावजी ईटनकर यांच्या २४ व्या पुण्यस्मरण दिनाच्या पर्वावर ‘लोकमत’च्या सहकार्याने स्व. देवरावजी ईटनकर आयटीआय, ग्रामीण रुग्णालयाजवळ, बुधवारी पेठ, उमरेड येथे सकाळी ९ ते दुपारी ३ वाजतापर्यंत रक्तदान शिबिर होईल.

Web Title: Widespread support for Lokmat's blood donation drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.