पत्नी व प्रियकराला जन्मठेप
By admin | Published: February 17, 2017 02:53 AM2017-02-17T02:53:37+5:302017-02-17T02:53:37+5:30
प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून केल्यानंतर मृतदेह घरात पुरून त्यावर ‘फ्लोरिंग’ करून पुरावा नष्ट करण्याचा
सत्र न्यायालय : पतीच्या निर्घृण खुनानंतर मृतदेह घरात पुरून केले होते ‘फ्लोरिंग‘
नागपूर : प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून केल्यानंतर मृतदेह घरात पुरून त्यावर ‘फ्लोरिंग’ करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नी व प्रियकराला अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अमोल ठाकूरसिंग राठोड (३८) रा. भवानीनगर पारडी आणि रंजू रमेश बानेवार (३०) रा. आराधना सोसायटी बिडगाव, अशी आरोपींची नावे आहेत. रमेश परसराम बानेवार (३९), असे मृताचे नाव होते.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, रंजू बानेवार हिचा रमेश बानेवार हा पती होता. तो गवंडी काम करून कुटुंबाचे पालनपोषण करायचा. त्याला एक मुलगी आणि दोन मुले होती. त्यापैकी मोठा मुलगा गोंदिया जिल्ह्यातील आपल्या आजीकडे राहात होता. रंजूचे अमोल राठोड याच्यासोबत अनैतिक संबंध होते. मुले त्याला ‘अंकल’ म्हणायची.
असा घडला थरार
१३ सप्टेंबर २०१५ रोजी तान्हा पोळा होता. नेमकी याच दिवशी रमेश बानेवारच्या खुनाची दुर्दैवी घटना घडली होती. त्या दिवशी अमोल राठोड हा तीन वेळा रमेशच्या घरी आला होता. पहिल्यांदा तो दोन साथीदारांसह दुपारी ३ ते ४ वाजताच्या सुमारास आला होता. रंजूने चहा करून दिला होता. रमेशला समज देऊन तिघेही निघून गेले होते. पुन्हा हे तिघे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आले होते आणि रमेशला समज देऊन निघून गेले होते.