दीड वर्षांअगोदर पत्नीची आत्महत्या, आता पतीला अटक

By योगेश पांडे | Published: February 4, 2024 04:51 PM2024-02-04T16:51:08+5:302024-02-04T16:51:54+5:30

जितेंद्र चोटीराम केशवानी (४०, हुडको कॉलनी, जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे. वंशिका (३२) असे त्याच्या पत्नीचे नाव होते.

Wife committed suicide one and a half years ago, now husband arrested | दीड वर्षांअगोदर पत्नीची आत्महत्या, आता पतीला अटक

दीड वर्षांअगोदर पत्नीची आत्महत्या, आता पतीला अटक

नागपूर : डोक्यात संशयाचा किडा शिरल्यानंतर स्वत:च्या पत्नीचा वारंवार छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

जितेंद्र चोटीराम केशवानी (४०, हुडको कॉलनी, जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे. वंशिका (३२) असे त्याच्या पत्नीचे नाव होते. तो वारंवार तिच्यावर संशय घ्यायचा व तिला मारहाण करायचा. अगदी घरखर्चासाठीदेखील पैसे देत नव्हता. लहानसहान गोष्टीवरून वाद घालत तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून वंशिकाने राहत्या घरीच ३० ऑगस्ट २०२२ रोजी गळफास घेत आत्महत्या केली होती. पोलिसांनी त्यावेळी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र तिच्या माहेरच्या मंडळींनी चौकशी केली असता जितेंद्नने केलेल्या छळाची बाब समोर आली. 

तिची बहिण हेमा नागपाल हिच्या तक्रारीवरून जरीपटका पोलीस ठाण्यात आरोपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
 

Web Title: Wife committed suicide one and a half years ago, now husband arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.