मुंबईहून रिवाकडे निघालेल्या कामगाराच्या पत्नीची प्रवासातच प्रसुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 11:21 PM2020-05-06T23:21:30+5:302020-05-06T23:24:34+5:30

मुंबईहून मध्य प्रदेशातील रिवाकडे निघालेल्या एका कामगाराच्या पत्नीला वाटेतच प्रसव कळा आल्या. तिची अवघडलेली अवस्था बघून सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावले. गुमथळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवून तिची सुखरूप प्रसुती झाली, तेव्हा कुठे सर्वांचा जीव भांड्यात पडला.

The wife of a worker who left Mumbai for Riva gave birth on the way | मुंबईहून रिवाकडे निघालेल्या कामगाराच्या पत्नीची प्रवासातच प्रसुती

मुंबईहून रिवाकडे निघालेल्या कामगाराच्या पत्नीची प्रवासातच प्रसुती

Next
ठळक मुद्देभररस्त्यात प्रसुती कळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईहून मध्य प्रदेशातील रिवाकडे निघालेल्या एका कामगाराच्या पत्नीला वाटेतच प्रसव कळा आल्या. तिची अवघडलेली अवस्था बघून सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावले. गुमथळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवून तिची सुखरूप प्रसुती झाली, तेव्हा कुठे सर्वांचा जीव भांड्यात पडला.

सुधा कौल असे या महिलेचे नाव असून ती १९ वर्षाची आहे. परप्रांतात निघालेल्या स्थलांतरित कामगारांच्या मदतीसाठी कापसी बायपास मार्गावर स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी एक मदत केंद्र उभारले आहे. बुधवारी दुपारी १२.१५ वाजताच्या दरम्यान ही महिला आपल्या पतीसह याठिकाणी आली होती. मदत केंद्रावर नाश्ता केल्यावर गर्दी असल्याने व बरे वाटत नसल्याने ती विश्रांतीसाठी जवळच्या एका झाडाखाली गेली. मात्र तिथेच तिला प्रसव कळा सुरू झाल्या. तिची ही अवस्था बघून सोबतच्या कामगारांनी व तिच्या पतीने मदत केंद्रावरील सामाजिक कार्यकर्त्यांना सहकार्याची विनंती केली. तिची ही अवघडलेली परिस्थिती लक्षात घेऊन सुनील सोमय्या व स्थानिक जि.प सदस्या अवंतिका लेकुरवाळे यांनी आपल्या कारमध्ये या कामगार महिलेला व तिच्या पतीला बसवून गुमथळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. दुपारी १ वाजता तिथे पोहोचताच अगदी दहा मिनिटात तिची नैसर्गिक प्रसुती झाली. डॉक्टर वैथारिया यांनी तिच्यावर उपचार केले. सध्या बाळ आणि मातेची प्रकृती ठणठणीत असून सामाजिक कार्यकर्ते मदतीत गुंतले आहेत. सध्या महिलेला नागपूरच्या डागा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. दोघांची प्रकृती उत्तम आहे. गुमथळा येथील सरपंच अमोल महल्ले तसेच या मदत केंद्रावरील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या कामगार कुटुंबाच्या मदतीसाठी तत्परतेने धाव घेतली
मध्य प्रदेशातील रिवा येथील काही कामगार मुंबईत कामाला आहेत. सुधा ही महिलासुद्धा आपल्या पतीसह मुंबईत मजुरीच्या कामाला गेली होती. मुंबईतून सुमारे दहा किलोमीटर पायी चालल्यावर त्यांना एक वाहन मिळाले. त्यातून ते नाशिकपर्यंत आले. तिथून पुन्हा काही अंतर पायी चालल्यावर एका वाहनातून त्यांनी मजल-दरमजल करीत तर कधी पायी अंतर चालत नागपूर गाठले.

Web Title: The wife of a worker who left Mumbai for Riva gave birth on the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.