अपघातात पत्नीचा मृत्यू; पती, भाचा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:09 AM2021-05-08T04:09:03+5:302021-05-08T04:09:03+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क बुटीबाेरी : भरधाव ट्रकने माेटारसायकलला मागून जाेरात धडक दिली. यात दुचाकीवरील पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर ...

Wife's death in an accident; Husband, nephew injured | अपघातात पत्नीचा मृत्यू; पती, भाचा जखमी

अपघातात पत्नीचा मृत्यू; पती, भाचा जखमी

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

बुटीबाेरी : भरधाव ट्रकने माेटारसायकलला मागून जाेरात धडक दिली. यात दुचाकीवरील पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तिचे पती व १० वर्षीय भाचा गंभीर जखमी झाला. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-वर्धा मार्गावरील सातगावफाटा येथील उड्डाणपुलावर गुरुवारी (दि. ६) रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली.

माधुरी रवींद्र उमक (४०) असे मृत पत्नीचे तर रवींद्र भाऊराव उमक (४०, रा. गाडगेबाबा सोसायटी, नवीन सुभेदार लेआउट, अयोध्यानगर, नागपूर) असे गंभीर जखमी पती व यश इंगळे (१०) असे जखमी भाच्याचे नाव आहे. हे तिघेही गुरुवारी रात्री त्यांच्या एमएच-३१/डीवाय-५०३५ क्रमांकाच्या माेटारसायकलने आसोला-सावंगी (ता. हिंगणा) येथून बुटीबाेरीमार्गे नागपूरला जात हाेते. ते नागपूर-वर्धा मार्गावरील सातगावफाटा येथील उड्डाणपूल पार करीत असतानाच मागून वेगात आलेल्या सीजी-०७/एएस-८८५५ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली.

यात तिघेही राेडवर काेसळले. मात्र, माधुरी ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर रवींद्र व यश दाेघेही गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी रवींद्र व यश या दाेघांना बुटीबाेरी येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती केले, तर माधुरीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविला. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून ट्रकचालक नरेंद्रकुमार प्रेमलाल पर्स (३२, रा. गाेरबागाव, ता. भिलाईगड, जिल्हा बलाेदा, छत्तीसगड) यास अटक केली. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी करीत आहेत.

Web Title: Wife's death in an accident; Husband, nephew injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.