पतीच्या स्मृतीदिनी पत्नीचे अवयवदान; तीन मुलींनी घेतला पुढाकार

By सुमेध वाघमार | Published: June 10, 2023 06:50 PM2023-06-10T18:50:20+5:302023-06-10T18:58:09+5:30

Nagpur News आईचे अचानक ब्रेन हॅमरेज होऊन ती ब्रेन डेड झाल्याचे निदान झाल्यानंतर, तीन मुलींनी आईचे अवयवदान केले. योग असा की, ते त्यांच्या वडिलांच्या स्मृतीदिनी झाले.

wife's organ donation on husband's memorial day; Three girls took the initiative | पतीच्या स्मृतीदिनी पत्नीचे अवयवदान; तीन मुलींनी घेतला पुढाकार

पतीच्या स्मृतीदिनी पत्नीचे अवयवदान; तीन मुलींनी घेतला पुढाकार

googlenewsNext

सुमेध वाघमारे 
नागपूर : १० वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्याने आईने संसार सांभाळला. तिन्ही मुलींना शिक्षण देत मोठे केले. संसाराची गाडी रुळावर येत असताना अचानक ‘ब्रेन हॅमरेज’ झाले. उपचार सुरू असताना डॉक्टरांनी ‘ब्रेन डेड’ झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली. आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या तिन्ही बहिणींनी त्या दु:खातही अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेतला. या मानवतावादी निर्णयाने तिघांना नवे जीवन मिळाले. विशेष म्हणजे, वडिलांच्या मृत्यूच्या दिवशी आईचे अवयवदान झाले.


  नागपूर येथील मस्जीद रोड तुलानी चौक डिफे न्स येथील रहिवासी ललिता टवले त्या अवयवदात्याचे नाव. त्यांचे पती ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबाझरी येथे  कामाला होते. त्यांचे १० जून रोजी अचानक निधन झाले. त्यांच्या जागी ललिता यांना नोकरी मिळाली. ऑर्डनन्स फॅक्टरीच्या क्वार्टरमध्ये राहून आपल्या तीन मुलींचा सांभाळ करीत विस्कळीत झालेला संसाराचा गाडा मोठ्या हिंमतीने रुळावर आणला. २०१८ मध्ये ऑर्डनन्स फॅक्टरीकडून उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना बक्षीसही मिळाले.

८ जून रोजी ललिता कामावर असताना अचानक प्रकृती खालवली. एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना डॉक्टरांच्या एका पथकाने तपासून मेंदू मृत म्हणजे ‘ब्रेन डेड’ झाल्याची माहिती कुटुंबियांना दिली. मुली मोनिका, पूजा, शीतल आणि नातेवाईकांना धक्का बसला. डॉक्टरानी त्यांना अवयदान करून आईला अवयवरुपी जिवंत ठेवण्याचा सल्ला दिला. तिन्ही मुलींनी त्या दु:खातही पुढाकर घेतला. आज १० जून रोजी त्यांनी आईचे अवयवदान केले. याच दिवशी वडिलांचे निधन झाल्याने हे अवयवदान त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरले. ‘झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर’ने (झेडटीसीस) त्यांच्या दोन्ही किडनी व लिव्हरचे नियमानुसार तीन रुग्णांना दान केले. सायंकाळी अंबाझरी येथील आयुध निमार्णी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलींच्या या पुढाकाराचे समाजात कौतुक होत आहे. या वर्षातील हे १३ वे तर, आतापर्यंतचे १०८ वे अवयदान होते.

Web Title: wife's organ donation on husband's memorial day; Three girls took the initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.