वन्यप्राण्यांचा हैदाेस, शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:10 AM2021-03-01T04:10:27+5:302021-03-01T04:10:27+5:30
भिवापूर : तालुक्यातील बेसूर, इंदापूरसह परिसरातील शिवारांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. ते पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले ...
भिवापूर : तालुक्यातील बेसूर, इंदापूरसह परिसरातील शिवारांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. ते पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच या भागात काही दिवसांपासून पट्टेदार वाघ व अस्वलाचा संचार सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा परिसर उमरेड दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येताे. या वनपरिक्षेत्रात वाघ, बिबट, हरीण, अस्वल यासह अन्य प्राण्यांचा वावर असून, त्या प्राण्यांनी खाद्य व पाण्याच्या शाेधात गाव व शिवाराच्या दिशेनेे माेर्चा वळविला आहे. इंदापूर व बेसूर शिवारात अनेक शेतकऱ्यांना दिवसा वाघ व अस्वलाचे दर्शन झाले आहे. हे वन्यप्राणी मानवावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतर वन्यप्राणी पिकांचे प्रचंड नुकसान करीत असून, वनविभागाच्यावतीने तुटपुंजी नुकसान भरपाई दिली जाते. त्यामुळे या प्राण्यांचा कायम बंदाेबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.