परदेशातून आलेले बामन आम्हाला अक्कल शिकवणार का ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 02:36 PM2020-03-14T14:36:29+5:302020-03-14T14:36:53+5:30

जे स्वत: परदेशातून आले ते बामन आम्हाला अक्कल शिकविणार काय ? असे विधान पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपुरातील सभेत केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Will Baman from abroad teach us intelligence? | परदेशातून आलेले बामन आम्हाला अक्कल शिकवणार का ? 

परदेशातून आलेले बामन आम्हाला अक्कल शिकवणार का ? 

Next
ठळक मुद्देनितीन राऊत यांच्या वक्तव्यामुळे खळबळ


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकत्व संशोधन कायदा करून आम्हाला नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे मागितल्या जात आहेत. जे स्वत: परदेशातून आले ते बामन आम्हाला अक्कल शिकविणार काय ? असे विधान पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपुरातील सभेत केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्चला फुले, शाहु, आंबेडकर विचारसंवर्धन समितीच्या वतीने इंदोरा येथील मैदानात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना नितीन राऊत म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मुस्लिमांनी नेता मानले असते आणि बाबासाहेबांच्या विचारांनी वाटचाल करुन हिंदुस्थान म्हणणे सोडले असते, तर मुस्लिमांना हातबोट लावण्याची कुणाची हिंमत झाली नसती. मुस्लिमांना भारत म्हणायला लाज वाटते का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, मी कॉंग्रेसचा नेता असल्यामुळे दिल्लीत अनेक लोक भेटायला येत असतात. त्यांना वाटते मी आंबेडकरी चळवळीचा माणूस आहे, जो आजही आंबेडकर जिवंत ठेवून उभा आहे. डॉ. राऊत यांच्या ब्राह्मणविरोधी वक्तव्यामुळे संविधानातील शपथेच्या प्रथेला गालबोट लागल्याची भावना व्यक्त होत आहे. कॉंग्रेसने देशात सीएए, एनआरसी आणि एनपीआरचा विरोध केला आहे. कॉंग्रेसने २०१० साली जो एनपीआर आणला होता. त्या अटी जशाच्या तशा ठेवल्या तरच लागू होईल, असे कॉंग्रेसचे धोरण आहे. परंतु तसे न झाल्यामुळे कॉंंग्रेसचा याला विरोध असल्याचे राऊत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ राज्यात व्हायरल होत असून अनेक संघटनांनी त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रीपदाची शपथ घेताना सर्वांना समान वागणूक देईल, कुणाचाही द्वेष करणार नाही, अशी शपथ सर्व मंत्र्यांना घ्यावी लागते. नितीन राऊत यांनी असे वक्तव्य केल्यामुळे परशुराम सेवा संघ महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
............

Web Title: Will Baman from abroad teach us intelligence?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.