विधानसभेत आजवरचा सर्वात मोठा विजय होईल : मुख्यमंत्र्यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 11:43 PM2019-09-30T23:43:16+5:302019-09-30T23:44:16+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना महायुतीची मुख्यमंत्र्यांनी नागपुरात घोषणा केली. महायुतीला किती जागा मिळतील याचा अंदाज तर बांधत नाही. मात्र मागील पाच वर्षांच्या महायुती सरकारच्या कामगिरीला घेऊन आम्ही जनतेत जाऊ व राज्याच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय असेल, असा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना महायुतीची मुख्यमंत्र्यांनी नागपुरात घोषणा केली. महायुतीला किती जागा मिळतील याचा अंदाज तर बांधत नाही. मात्र मागील पाच वर्षांच्या महायुती सरकारच्या कामगिरीला घेऊन आम्ही जनतेत जाऊ व राज्याच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय असेल, असा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.
भाजपा-शिवसेनेसोबतच रासप, रिपाइं, शिवसंग्राम, रयतक्रांती यांच्या महायुतीची घोषणा झाली असली तरी अजूनही जागावाटपाचा नेमका ‘फॉर्म्युला’ समोर आलेला नाही. एक ते दोन दिवसांत सर्व जागा घोषित होतील, असे सांगत मुख्यमंत्र्यांनीदेखील जागावाटपाच्या आकड्यावर भाष्य करण्याचे टाळले. भविष्यातील तर माहिती नाही, परंतु ‘न भुतो’ असा विजय महायुतीला मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.