.... मर्दानी बनणार आणि चोख उत्तर देणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 10:27 AM2020-01-01T10:27:37+5:302020-01-01T10:29:42+5:30

मुस्लीम शाळकरी मुलींनी पाहिला लैंगिक प्रबोधनावरचा चित्रपट महोत्सव

.... will be masculine and answer correctly! | .... मर्दानी बनणार आणि चोख उत्तर देणार!

.... मर्दानी बनणार आणि चोख उत्तर देणार!

Next
ठळक मुद्देहे पाहिले चित्रपट दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात भेदभाव, कस्तुरी, कॅब राईड, नेमप्लेट, अक्षरा लूप्स हे लैंगिक हिंसाचारावर आधारित तर, मर्दानी-२, पिंक हे लैंगिक हिंसाचाराला आव्हान देणारे चित्रपट दाखवण्यात आले.जाणून घेतला गुड टच आणि बॅड टच

वर्षा बाशू।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: होय, आम्हाला टारगट मुले-माणसे छेडतात.. घाणेरड्या कॉमेंटस करतात.. खूप राग येतो आणि लाजही वाटते. पण आता यापुढे सहन नाही करणार... मर्दानी बनणार आणि त्यांना चोख उत्तर देणार. हा निर्धार आहे, रोज बुरखा घालून शाळेत जाणाऱ्या मुस्लीम मुलींचा. केवळ एकदोन नव्हे तर तब्बल १०० हून अधिक जणींचा. बडा ताजबाग भागात असलेल्या उर्दू शाळेतील आठवी ते दहावी या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा. ही हिंमत त्यांना दिली आहे लैंगिक हिंसाचार व भेदभावावर आधारित एका चित्रपट महोत्सवाने.
जिथे स्वत:चा चेहराही उघडा ठेवणे दुरापास्त तिथे लैंगिकतेवर आधारित चित्रपट महोत्सव पाहणे व आपल्या जाणीवा समृद्ध करणे ही तर दूरचीच बाब. त्यातून मग हिंसाचाराला बळी पडण्याची मानसिकता रुजत जाते. लैंगिक हिंसाचाराला उत्तर देणे ही चूक नाही, ते योग्य पाऊल आहे याचा आत्मविश्वास मुलींना मिळावा या हेतूने अलीकडेच या महोत्सवाचे आयोजन केल्याचे रुबी वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्ष रुबिना पटेल सांगतात. लहान वयात झालेले लग्न, अकाली लादलेले मातृत्व आणि अचानक दिलेला तलाक या चक्रात अडकलेल्या अनेक मुली या भागात राहतात. त्या घरच्या जाचाला सहन करतानाच, बाहेरचाही छळ सोसत असतात. आर्थिकदृष्ट्या परावलंबी असतात. त्यांना स्वबळाची जाण नसते. अशा मुलींसाठी व शाळकरी मुलींसाठी या चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून काही विधायक देता येईल असा विचार त्यामागे असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात अलीकडे झालेल्या प्रियंका रेड्डीसारख्या घटना पाहता, मुलींना सक्षम होण्याची गरज आहे. त्यांना लैंगिक हिंसाचार म्हणजे नेमके काय असते हे जाणवून देण्याची गरज आहे. त्या हिंसाचाराला, अत्याचाराला कसा विरोध करावा हेदेखील समजावण्याची आवश्यकता आहे. आणि मुख्य म्हणजे, असा विरोध केल्याने आपण वाईट ठरत नाही तर, गुन्हेगार वाईट ठरविला जातो, याचा विश्वास निर्माण होण्याची गरज आहे. या सर्व बाबींवर विचार करून या चित्रपट महोत्सवाचे आयोजन सोसायटीतर्फे करण्यात आले होते. या महोत्सवात तीन दिवस चित्रपट दाखवण्यात आले. बडा ताजबाग भागातील उर्दू शाळेतल्या आठवी ते दहावी या वर्गातील मुलींनी हे सर्व चित्रपट पाहिले.
या चित्रपटांना पाहिल्यानंतर या मुलींनी उत्स्फूर्तपणे दिलेल्या निडर प्रतिक्रिया कौतुकास्पद होत्या. हा महोत्सव संपल्यानंतर मुलींनी विचारले होते असंख्य प्रश्न. काहींनी केला होता व्यक्त खंबीरतेने जगण्याचा निर्धार, तर काहींना उमगले होते जगण्याचे एक नवे सत्य.
 

Web Title: .... will be masculine and answer correctly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.