सुरू राहणार ४७ औषधे दुकाने
By admin | Published: May 30, 2017 02:02 AM2017-05-30T02:02:18+5:302017-05-30T02:02:18+5:30
‘आॅनलाईन’ व ‘ई-पोर्टल’ फार्मसीच्या विरोधात ‘नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने आज मंगळवारी पुकारलेल्या एकदिवसीय बंदला घेऊन...
‘एफडीए’चा बंदवर पर्याय : औषधे उपलब्ध न झाल्यास अधिकाऱ्यांना करा फोन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आॅनलाईन’ व ‘ई-पोर्टल’ फार्मसीच्या विरोधात ‘नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने आज मंगळवारी पुकारलेल्या एकदिवसीय बंदला घेऊन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कंबर कसली आहे. प्रशासनाने बंदच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील ४७ दुकाने सुरू ठेवण्याची व्यवस्था केली आहे. त्यानंतरही ज्या रुग्णांना औषधे उपलब्ध न झाल्यास त्यांनी ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांना फोन करून संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे. ‘आॅनलाईन व ई-फार्मसी’च्या विरोधातील बंदमध्ये नागपूर जिल्ह्यातील सुमारे ३,२०० औषध विक्रेते सहभागी होण्याची शक्यता असोसिएशनने वर्तविली आहे. असे झाल्यास रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची ऐनवेळी धावपळ उडण्याची शक्यता आहे. याची तीव्रता कमी करण्यासाठी ‘एफडीए’ने शहरातील ३७ तर ग्रामीण भागातील १० औषध दुकाने सुरू राहणार असल्याची माहिती देत, त्यांचा पत्ता उपलब्ध करून दिला आहे.
लोकमतचा
पुढाकार
शहरात ही दुकाने राहतील उघडी
दीक्षाभूमीमागील लक्ष्मीनगर
रेशीमबाग येथील बजरंग कॉम्प्लेक्स
देवनगर येथील ताजश्री होंडा समोरील
खामला चौक
त्रिमूर्तीनगर येथील पहिल्या बसथांबाजवळील
नंदनवन येथील आयसीआयसीआय बँकजवळील
मानकापूर येथील फरस गेट समोरील
स्वावलंबीनगर येथील ढोमणे सभागृहाजवळील
श्रद्धानंदपेठ माटे चौक
भगवाननगर डॉ. नाईक हॉस्पिटल जवळील
म्हाळगीनगर चौक
अयोध्यानगर येथील बीएसएनएल आॅफीससमोर
मानेवाडा रोड सिद्धेश्वर सभागृहाजवळ
मनीषनगर येथील रिलायन्स फ्रेशजवळील
सीए रोड येथील डॉ. आंबेडकर चौक
जरीपटका येथील युनियन बँकसमोरील
रविनगर येथील दंदे हॉस्पिटलजवळील
पांडे ले-आऊट येथील गुलमोहर हॉलजवळ
ग्रामीण भागात ही दुकाने राहतील सुरू
काकडे मेडिकल स्टोअर्स, रामधन चौक, भिवापूर
सप्तशृंगी मेडिकल स्टोअर्स, भिवापूर मुख्य रोड
जैन मेडिकल स्टोअर्स, पारशिवनी
गजानन मेडिकल स्टोअर्स, पारशिवनी
प्रिशा मेडिकल स्टोअर्स, कामठी
ओमप्रकाश मेडिकल स्टोअर्स, कन्हान
न्यू किंमतकर मेडिकल स्टोअर्स, गांधी चौक, रामटेक
किरण मेडिकल स्टोअर्स, मनसर
मातोश्री मेडिकल स्टोअर्स, नगरधन
या अधिकाऱ्यांशी साधा संपर्क
नावमो. क्रमांक
मोहन केकतपुरे सहआयुक्त : ७७९८७८६१९५
व्ही.आर. रवी औषध निरीक्षक: ८८५५९३९५५०
पी.एम. बल्लाळ: ९४२३६९०६३४
स्वाती भरडे : ९८९०८२८१९४
मोनिका धवड: ९८८१६८०४१८
महेश गाडेकर: ७७०९७८८८२८