परिवहन व्यवस्थापनात उद्योगाभिमुख ज्ञान निर्माण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:06 AM2021-06-18T04:06:59+5:302021-06-18T04:06:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - परिवहन व्यवस्थापनात उद्योगाभिमुख ज्ञान निर्माण करण्याच्या दृष्टीने व कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आयआयएम नागपूर व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - परिवहन व्यवस्थापनात उद्योगाभिमुख ज्ञान निर्माण करण्याच्या दृष्टीने व कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आयआयएम नागपूर व सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट या दोन संस्थांमध्ये गुरुवारी सामंजस्य करार झाला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.
परिवहन क्षेत्रात क्षमता आणि उत्पादकेत सुधारणा करण्याचा उद्देशही या करारात आहे. यावेळी टेक महिंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रबंध संचालक सी. पी. गुरनानी, आयआयएम नागपूरचे संचालक भीमराया मेत्री, सीआयआरटीचे संचालक डॉ. राजेंद्र बी. सनेर पाटील, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्लागार वैभव डांगे उपस्थित होते.
देशाच्या परिवहन क्षेत्रात ऑटोमोबाईल हबमध्ये विकास करण्याच्या दृष्टीने नवीन प्रवेशद्वारे या सामंजस्य करारामुळे उघडली जातील. नवीन पिढीमध्ये कौशल्य आणि प्रतिभा निर्माण करण्याच्या व त्याला आकार देण्यासाठी या दोन संस्था महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या कराराचा फायदा संपूर्ण महाराष्ट्राला होईल.