विधान परिषदेत मदतीसाठी शिवसेनेशी चर्चा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 09:20 PM2022-06-13T21:20:35+5:302022-06-13T21:21:05+5:30
Nagpur News विधान परिषद निवडणुकीत सर्व अपक्ष महाविकास आघाडीसोबत राहतील, असा दावा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला.
नागपूर : विधान परिषद निवडणुकीत संख्याबळानुसार शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून येतील. काँग्रेसला दुसरी जागा निवडून आणण्यासाठी ९ मतांची गरज आहे. सर्व मिळून लढलो तर ते शक्य होईल. याबाबत शिवसेनेसोबत चर्चा केली जाईल. विधान परिषद निवडणुकीत सर्व अपक्ष महाविकास आघाडीसोबत राहतील, असा दावा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला.
राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पहिल्या पसंतीची १६२ मते मिळाली. त्यामुळे सरकार स्थिर आहे हे दिसून येते. या निवडणुकीत आमचे नियोजन चुकले. विधान परिषद निवडणुकीत आम्ही ताक पण फुंकून पिऊ, असेही वडेट्टीवार म्हणाले.
चावाचावीचे राजकारण करण्यापेक्षा हस्तांदोलनाचे राजकारण करून महाराष्ट्राला प्रगतिपथावर न्यावे लागेल. स्थिर सरकार असेल तर विकासाला गती मिळते, सरकारला अस्थिर करत असेल तर महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसेल, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.