शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करणार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:08 AM2021-07-27T04:08:53+5:302021-07-27T04:08:53+5:30
नागपूर : शहिदांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या कुटुंबीयांना प्रशासन सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी विमला ...
नागपूर : शहिदांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या कुटुंबीयांना प्रशासन सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी सोमवारी येथे केले. सैनिकी मुलांच्या वसतिगृहात आयोजित कारगिल विजय दिवसाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतेंद्रकुमार चवरे, माणिक इंगळे उपस्थित होते.
शहिदांच्या हुतात्म्यांचे विस्मरण होणार नाही, तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा शासकीय योजनांमध्ये प्राधान्याने विचार करण्यात येईल, असेही त्यांनी आश्वस्त केले.
जिल्हाधिकारी विमला आर. यांनी शहीद भूषणकुमार सतई व शहीद नरेश बडोले यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. वीरमाता मीरा रमेशराव सतई, वीरपत्नी प्रमिला नरेश बडोले यांचा जिल्हाधिकारी विमला आर. यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.