धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्कसाठी आज जागा मिळणार
By admin | Published: August 28, 2015 03:05 AM2015-08-28T03:05:00+5:302015-08-28T03:05:00+5:30
जवळपास सहा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून मिहान-सेझमध्ये उभारण्यात येणाऱ्या अनिल अंबानी यांच्या धीरूभाई अंबानी ...
समारंभात अनिल अंबानी येणार : सहा हजार कोटींची गुंतवणूक
नागपूर : जवळपास सहा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून मिहान-सेझमध्ये उभारण्यात येणाऱ्या अनिल अंबानी यांच्या धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्कसाठी जागेचे पत्र ‘एमएडीसी’तर्फे रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लिमिटेडला २८ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये होणाऱ्या विशेष कार्यक्रमात देण्यात येणार आहे.
पार्कसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लिमिटेडला विमानतळाजवळील एअर इंडियाच्या एमआरओलगत २८९ एकर जागा मंजूर केली आहे. या विशेष समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे चेअरमन अनिल अंबानी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर प्रवीण दटके, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खा. कृपाल तुमाने, खा. अविनाश पांडे, खा. अजय संचेती, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, समीर मेघे, सुधाकर देशमुख, सुधीर पारवे, डॉ. आशिष देशमुख, सुनील केदार, मल्लिकार्जुन रेड्डी, राजेंद्र मुळक, जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, नागो गाणार, अनिल सोले आदींसह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशाताई सावरकर आणि एमएडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)