- तर लागेल ‘पाणीबाणी’
By admin | Published: June 22, 2017 01:58 AM2017-06-22T01:58:42+5:302017-06-22T01:58:42+5:30
नागपूर विभागात काही तुरळक भाग वगळता अद्याप मान्सून बरसलेला नाही. पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या
पावसाची प्रतीक्षा : प्रकल्पात १० टक्केच जलसाठा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर विभागात काही तुरळक भाग वगळता अद्याप मान्सून बरसलेला नाही. पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या धोक्यात आल्या आहेत. दुसरीकडे मोठ्या प्रकल्पातील जलसाठा १० टक्क्यावर आला असल्याने पुढील काही दिवस परिस्थिती अशीच कायम राहिल्यास शहरात पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकण्याचा धोका आहे.
मागील पाच वर्षातील जलसाठ्याचा विचार करता सरासरी ९२२ द.ल.घ.मी. आहे. परंतु सध्या विभागातील मोठ्या प्रकल्पात जेमतेम २९४. द.ल.घ.मी. जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी विभागातील मोठ्या प्र्रकल्पात ६३६ द.ल.घ.मी. जलसाठा होता. म्हणजेच यंदा याच्या निम्माही जलसाठा शिल्लक नाही. नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच प्रकल्पात ५१ द.ल.घ.मी म्हणजेच ३६ टक्के आहे. गेल्यावषी याच तारखेला ६८ द.ल.घ.मी जलसाठा होता. सरासरीचा विचार करता मागील पाच वर्षांची सरासरी १२४ द.ल.घ.मी. इतकी आहे.
वेणा प्रकल्पात २२ टक्के, इंटियाडोह प्रकल्पात १४, पुजारीटोला २३, आसोला मेंढा ४० , दिना प्रकल्पात १२, बोर १४, धाम १५ टक्के लोअर वर्धा प्रकल्पात १५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अन्य प्रकल्पांची परिस्थिती याहून बिकट आहे.