खिंडसी पूरक कालवा पूर्णत्वास जाणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:08 AM2021-07-27T04:08:22+5:302021-07-27T04:08:22+5:30

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : महादुला (ता. रामटेक) व परिसरातील शेकडाे शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या खिंडसी पूरक कालव्याचे ...

Will Khindsi supplementary canal be completed? | खिंडसी पूरक कालवा पूर्णत्वास जाणार का?

खिंडसी पूरक कालवा पूर्णत्वास जाणार का?

Next

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : महादुला (ता. रामटेक) व परिसरातील शेकडाे शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या खिंडसी पूरक कालव्याचे काम मध्ये बंद करण्यात आले. ते पुन्हा सुरू करण्यासाठी नेते व अधिकाऱ्यांच्या मध्यंतरी झालेल्या बैठका निष्फळ ठरल्या आहेत. त्यातच या कालव्याचे काम सुरू करण्याची मागणी करीत महादुला येथील शेतकऱ्यांनी आंदाेलनाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी आ. आशिष जयस्वाल यांच्याशी चर्च केली असता, त्यांनी काम सुरू हाेण्याचे संकेत दिले. ते कधी सुरू हाेणार व पूर्णत्वास जाणार हे मात्र स्पष्ट केले नाही.

तालुक्यातील २७ गावांमध्ये सिंचनाची काेणतीही साेय नसल्याने येथील शेतकऱ्यांना केवळ काेरडवाहू शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून राहावे लागते. या भागात धानाची शेती केली जात असल्याने तसेच धानाला माेठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असल्याने खिंडसी पूरक कालवा निर्मिती राज्य शासनाने मंजुरी दिली. पेंच प्रकल्पातील पाणी खुला व भूमिगत कालव्याद्वारे खिंडसी जलाशयात आणायचे. त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी करायचा अशी ही याेजना आहे. या जलाशयाची पाणी साठवण क्षमता १०४ दलघमी आहे. यात ६७ दलघमीपेक्षा अधिक पाणी राहिल्यास ते कालव्याद्वारे सिंचनाला पाणी देण्याचे या प्रकल्पाद्वारे नियोजन केले हाेते.

या प्रकल्पावर २०० काेटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, उर्वरित कामासाठी १०० काेटी रुपयांची आवश्यकता आहे. हा प्रकल्प मध्येच गुंडाळणे आत्मघातकी ठरू शकते, अशी प्रतिक्रिया जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे. कारण, पेंच जलाशय ताेतलाडाेहमुळे लवकर भरत असल्याने त्यातील पाणी खिंडसीत आणणे शक्य असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

या प्रकल्पासाठी भंडारबाेडी, महादुला, पंचाळा व हसापूर येथील ११३ शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी देण्याची तयारी दर्शविली असताना प्रशासन काहीही हालचाली करायला तयार नाही. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी धनराज झाडे, मनाेहर दियेवार, हेमराज बडवाईक, राजेश चाैरे, हिंमत घाेडागाडे, धनराज बडवाईक, रामलाल वैद्य, अंकुश वैद्य, चंद्रभान मेहर या शेतकऱ्यांनी केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.

...

२०१७ मध्ये पूर्ण हाेणे अपेक्षित

या प्रकल्पाला राज्य सरकारने सन २०१० मध्ये मंजुरी दिली हाेती. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत २०७.९ काेटी रुपये असल्याचे सांगण्यात आले हाेते. हा प्रकल्प सन २०१७ मध्ये पूर्ण हाेणे अपेक्षित हाेते. वास्तवात, पूर्णत्वाची मुदत संपून साडेतीन वर्षे झाले आहेत. या प्रकल्पात रामटेक तालुक्यातील १४ व भंडारा जिल्ह्यातील चार गावांचा समावेश केला आहे. याची सिंचन क्षमता २,४९३ हेक्टरची आहे.

...

२० टक्के कामासाठी १०० काेटींची गरज

आजवर या याेजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, त्यावर २०० काेटी रुपयांचा खर्च झाल्याचे तसेच उर्वरित २० टक्के कामासाठी १०० काेटी रुपयांची आवश्यकता असल्याचे अधिकारी व नेते सांगतात. विशेष म्हणजे, मध्य प्रदेशातील चाैराई धरणामुळे ताेतलाडाेह व पेंच या दाेन प्रकल्पातील पाण्याची आवक कमी झाली आहे. कारण, तिन्ही प्रकल्प पेंच नदीवर आहेत. पेंच प्रकल्पात पाणीसाठा नसल्यास खिंडसी पूरक कालवा कुचकामी ठरताे.

Web Title: Will Khindsi supplementary canal be completed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.