जीव गेल्यावर पुलावरील खड्डा बुजविणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:18 AM2021-09-02T04:18:16+5:302021-09-02T04:18:16+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : आमडी फाटा ते पारशिवनी मार्गावरील पेंच नदीवरील पुलाजवळ माेठा खड्डा पडला आहे. हा खड्डा ...

Will the pit on the bridge be filled after the death? | जीव गेल्यावर पुलावरील खड्डा बुजविणार काय?

जीव गेल्यावर पुलावरील खड्डा बुजविणार काय?

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

पारशिवनी : आमडी फाटा ते पारशिवनी मार्गावरील पेंच नदीवरील पुलाजवळ माेठा खड्डा पडला आहे. हा खड्डा सध्या जीवघेणा ठरत आहे. ऐन पुलाजवळ असलेल्या खड्ड्यामुळे मंगळवारी (दि.३१) रात्रीच्या सुमारास भरधाव ट्रक नदीत काेसळला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचालक व क्लिनर जखमी झाले. राष्ट्रीय रस्ते महामार्गाच्या अधिकाऱ्यांना या खड्ड्याबाबत वारंवार कळवूनसुद्धा खड्डा बुजविला नाही. त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावर हा खड्डा बुजविणार काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

आमडी फाटा ते पारशिवनी मार्गावरील नयाकुंड गावानजीक पेंच नदीवर पूल असून, या पुलाजवळ रस्त्यावर माेठा खड्डा पडला आहे. मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास आमडी फाटामार्गे बैतूलकडे जाणारा एमपी-४८/एच-२१०२ क्रमांकाचा भरधाव ट्रक नदीत काेसळला. ट्रकमध्ये सिमेंटच्या बॅग हाेत्या. पुलाजवळ असलेल्या खड्ड्यामुळे चालकाचा ताबा सुटला व ट्रक नदीत शिरला. खड्डा चुकविण्याच्या नादात हा अपघात घडला. त्यात ट्रकचालक कैलास डाेंगरदिये व क्लिनर किशाेर पवार, दाेघेही रा. मुलताई, जि. बैतूल (मध्य प्रदेश) हे जखमी झाले. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ पाठविले.

विशेष म्हणजे, काही दिवसापूर्वी सिमेंटने डागडुजी करीत थातूरमातूर हा खड्डा बुजविण्यात आला. परंतु आठवडाभरातच पुन्हा त्याच ठिकाणी माेठा खड्डा पडला आहे. हा खड्डा रस्त्याच्या मधाेमध व माेठा असल्यामुळे या ठिकाणी नियमित अपघात हाेत आहेत. त्यामुळे हा खड्डा तात्काळ बुजविण्यात यावा, अशी मागणी अनिकेत निंबाेने, बंटी जयस्वाल, चंद्रशेखर शेरकी, अंकित पाटील आदींनी राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.

....

खड्डा चुकविण्याच्या नादात अपघात

मागील वर्षी पेंच नदीला माेठा पूर आला हाेता. या पुरामुळे पुलाची संरक्षक भिंत तुटली हाेती. शिवाय पुलावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले हाेते. ग्रामस्थांच्या वारंवार मागणीनंतर या पुलाची डागडुजी केल्या गेली. याच पेंच नदीवरील पुलाजवळ रस्त्यावर गेल्या तीन महिन्यापासून माेठा खड्डा पडला आहे. हा खड्डा चुकविण्याच्या नादात अपघात घडतात. खड्डा चुकविताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटून भरधाव वाहन नदीत केव्हा काेसळेल, याचा नेम नाही. यामुळे माेठी जीवितहानी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पेंच नदी पुलाजवळील हा जीवघेणा खड्डा तात्काळ बुजविण्याची मागणी नागरिकांची आहे.

010921\1658-img-20210901-wa0007.jpg~010921\img_20210828_095013.jpg

अपघात व खड्डा~खड्डा

Web Title: Will the pit on the bridge be filled after the death?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.