चिंधी बाजारासाठी जागा उपलब्ध करून देणार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:09 AM2021-02-26T04:09:41+5:302021-02-26T04:09:41+5:30
---------------- अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रम घ्या () नागपूर : अनुसूचित जमातीचे विद्यार्थी व नागरिकांना जात ...
----------------
अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रम घ्या ()
नागपूर : अनुसूचित जमातीचे विद्यार्थी व नागरिकांना जात वैधता प्रमाणपत्र कसे प्राप्त करावे याकरिता ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात अनुसूचित जमाती पडताळणी समिती नागपूरच्या उपायुक्त प्रीती बोंद्रे (कुळकर्णी) यांना भेटून निवेदन सादर करण्यात आले.
कोविड-१९ प्रादुर्भावामुळे अनुसूचित जमातीचे अनेक विद्यार्थी प्रत्यक्ष पडताळणी समिती कार्यालयात माहितीसाठी येऊ शकत नाहीत. भविष्यात प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. तेव्हा असे कार्यक्रम आयोजित करावे आणि ऑनलाइन मार्गदर्शनाची लिंक सर्व आदिवासी सामाजिक संघटना, शाळा महाविद्यालयांना पाठवण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळात दिनेश शेराम, स्वप्निल मसराम, राहुल मसराम, यशवंत मसराम, राहुल मडावी यांचा समावेश होता.
-------
मेडिकलची बंद पडलेली एमआरआय मशीन सुरू करा ()
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील बंद पडलेली एमआरआय मशीन तातडीने सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात शिष्टमंडळाने मेडिकलचे अधिष्ठाता सुधीर गुप्ता यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेत अधिष्ठाता यांनी सांगितले की, ३४ कोटी रुपये मंजूर झाले असून, लवकरच मशीन सुरू होईल, असे आश्वासन दिले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख नाना झोडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात महेश महाडिक, पंकज कुंभलकर, मिलन बढे, गोपाल नेहुलकर, धीरज डहाके, अक्षय लाखे, प्रवीण शिलारे, महेश चामट, सारंग अडसड यांचा समावेश होता.
-------------