नाशिकचा बदला घेणारच! कसबा, चिंचवड जिंकून दाखवू; नाना पटोले यांचे भाजपला आव्हान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2023 08:31 PM2023-02-16T20:31:27+5:302023-02-16T20:31:54+5:30

Nagpur News कसबा व चिंचवडसाठी भाजपचे डझनभर मंत्री तळ ठोकून बसले आहेत. मात्र, काहीही केले तरी या दोन्ही जागा जिंकून दाखवू, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला दिले.

will take revenge of Nashik ! Let's win Kasba, Chinchwad; Nana Patole's challenge to BJP | नाशिकचा बदला घेणारच! कसबा, चिंचवड जिंकून दाखवू; नाना पटोले यांचे भाजपला आव्हान 

नाशिकचा बदला घेणारच! कसबा, चिंचवड जिंकून दाखवू; नाना पटोले यांचे भाजपला आव्हान 

Next

नागपूर : आमचे घर मजबूत आहे. एक दोन माणसं घेऊन गेले म्हणजे भाजप मजबुत झाली, असे होत नाही. नाशिक मधला बदला घेणारच. कसबा व चिंचवडसाठी भाजपचे डझनभर मंत्री तळ ठोकून बसले आहेत. मात्र, काहीही केले तरी या दोन्ही जागा जिंकून दाखवू, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला दिले.

गुरुवारी पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, नाशिकमध्ये तुम्ही आमचा एक घेतला. त्या भागात ४७ आमदार आहेत. किमान ५० टक्के आमदार, खासदार काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आणण्याचा आपला संकल्प आहे. कुणालाही चोरून घेऊन जाणार नाही तर जनतेच्या मध्ये जाऊन निवडून आणू, असा इशाराही त्यांनी दिला. नऊ महिन्यांपासून न्यायालयात सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू आहे. त्यास एवढा उशीर होणं हे लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे. घटनापीठ पाच न्यायाधीशांचे असो किंवा सात न्यायाधीशांचे, मात्र निर्णय लवकर झाला पाहिजे. हे सरकार जास्त दिवस राहणे म्हणजे घटनेचा खून होईल. परिशिष्ट दहा प्रमाणे लवकर निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

फडणवीस, साडेतीन वर्षांपूर्वीच्या घटनेबाबत का बोलताहेत ?

- पहाटेचे सरकार स्थापन होण्याची घटना साडेतीन वर्षांपूर्वीची आहे. केंद्राची सत्ता आणि पैशाचा वापर करून महाराष्ट्रात त्यांनी सत्ता तर आणली. मात्र सत्ता येऊनही ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. एसटी कामगारांना प्रश्न सुटलेला नाही. फडणवीस साडेतीन वर्षांपूर्वीच्या घटनेबद्दल का बोलत आहेत, राज्यातील आजच्या प्रश्नांवर का बोलत नाही, असा सवालही पटोले यांनी केला.
 

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होतं का या प्रश्नावर.. 
सध्या न्यायालयात प्रकरण सुरू आहे.. न्यायालयातील सुनावणी बद्दल फार वक्तव्य करता येत नाही.. न्यायालयात काय निकाल लागते.. त्यानंतरच यावर प्रतिक्रिया देता येईल..

वंचितने पोटनिवडणुकीत घेतलेल्या भूमिकेबद्दल काही बोलायचं कारण नाही.. कसबा पेठमध्ये शिवसेनेचे उमेदवार महाविकास आघाडी उमेदवार म्हणून उभे आहे, अमरावतीमध्ये सुद्धा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत वंचितचा उमेदवार होता.. आमचा त्यांच्यासोबत काही संबंध किंवा आघाडी नाही.. त्यामुळे त्या पक्षाबद्दल बोलण्याचं काही कारण नाही...

Web Title: will take revenge of Nashik ! Let's win Kasba, Chinchwad; Nana Patole's challenge to BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.