‘एल-निनाे’च्या प्रभावाने यंदा खरेच दुष्काळ पडेल?; भारतीय हवामान विभागाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 08:50 AM2023-02-20T08:50:06+5:302023-02-20T08:50:19+5:30

एल-निनाेचा प्रभाव असताे; पण भारतात पावसाळी हंगामावर ‘इंडियन ओशन डायपाेल’ (आयओडी) चादेखील प्रभाव असताे

Will there really be a drought this year due to the influence of 'El-Nina'?; Denial of Indian Meteorological Department | ‘एल-निनाे’च्या प्रभावाने यंदा खरेच दुष्काळ पडेल?; भारतीय हवामान विभागाचा नकार

‘एल-निनाे’च्या प्रभावाने यंदा खरेच दुष्काळ पडेल?; भारतीय हवामान विभागाचा नकार

googlenewsNext

निशांत वानखेडे 

नागपूर : गेल्या वर्षी ‘ला-निना’च्या प्रभावाने भारतात पावसाचे प्रमाण वाढले हाेते. यावर्षी मात्र पावसाळी हंगामावर ‘एल-निनाे’चे सावट घाेंगावत आहे. एल-निनाेच्या प्रभावाने ऑस्ट्रेलिया व आशियामध्ये मान्सूनचा पाऊस कमी हाेताे. त्यामुळे यंदा भारतात दुष्काळाची परिस्थिती निर्माण हाेईल काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान विभागाने एल-निनाेची सक्रियता मान्य केली असली तरी माैन ठेवत दुष्काळाची शक्यता नाकारली आहे. 

यापूर्वी कधी जाणवला परिणाम?  
साधारणात: एल-निनाे ३ ते ६ वर्षांनी येताे. यापूर्वी २०१८ साली एल-निनाेचा प्रभाव हाेता व त्यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला. भारतात २००४, २००९, २०१४ व २०१८ म्हणजेच ५, ५, ४ वर्षांच्या अंतराने तो अवतरला आहे. 

एल-निनाेचा प्रभाव असताे; पण भारतात पावसाळी हंगामावर ‘इंडियन ओशन डायपाेल’ (आयओडी) चादेखील प्रभाव असताे. ताे त्यावेळच्या अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील पाण्याच्या तापमानातील फरकावर अवलंबून असताे. त्यामुळे एल-निनाेच्या परिणामाचा निष्कर्ष निराधार आहे. देशात पावसाळ्याच्या स्थितीवर शिक्कामाेर्तब करण्यास अद्याप दोन महिन्यांचे निरीक्षण बाकी आहे. - माणिकराव खुळे, निवृत्त हवामान तज्ज्ञ

Web Title: Will there really be a drought this year due to the influence of 'El-Nina'?; Denial of Indian Meteorological Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.