ट्रेन जाणार की रद्द ?.. प्रवाशांना कळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 01:49 AM2017-08-31T01:49:22+5:302017-08-31T01:50:13+5:30

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसला झालेला अपघात व मुंबईतील मुसळधार पाऊस यामुळे रेल्वे सेवा प्रभावित झाली व त्याचा फटका प्रवाशांना बुधवारीही सहन करावा लागला.

Will the train be canceled? .. Passengers do not know! | ट्रेन जाणार की रद्द ?.. प्रवाशांना कळेना!

ट्रेन जाणार की रद्द ?.. प्रवाशांना कळेना!

Next
ठळक मुद्देरद्द ट्रेनची माहिती घेताना दमछाक : वेटिंग रुममध्ये घालवले तासन्तास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसला झालेला अपघात व मुंबईतील मुसळधार पाऊस यामुळे रेल्वे सेवा प्रभावित झाली व त्याचा फटका प्रवाशांना बुधवारीही सहन करावा लागला. नागपूर स्टेशनवर रद्द झालेल्या गाड्यांची माहिती घेताना प्रवाशांची दमछाक झाली. कधी गाडी येणार असल्याचे सांगण्यात आले तर कधी काही वेळातच संबंधित गाडी रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यामुळे प्रवाशांची एकच धावपळ उडाली व प्रचंड गैरसोय झाली.
रेल्वे प्रशासनातर्फे फ्लॅटफॉर्म क्रमांक १ वर विशेष चौकशी बूथ लावण्यात आले होते. येथे फलकावर रद्द झालेल्या व विलंबाने धावत असलेल्या गाड्यांची माहिती लिहिली जात होती. मात्र, फलकावर लिहिली जात असलेली माहिती व प्रत्यक्षात माईकवरून होत असलेल्या घोषणेत फरक असल्याची तक्रार काही प्रवाशांनी केली.
उपस्टेशन व्यवस्थापक (वाणिज्य) कार्यालयात चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे प्रवाशांचा संभ्रम वाढला होता.
दरम्यान, बुधवारी नागपूर -मुंबई दुरंतो एक्स्प्रेस, गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेससह अन्य काही गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बºयाच प्रवाशांना स्टेशनवरून परतावे लागले. ज्यांना अत्यावश्यक काम होते त्यांना बस व ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागला. अव्यवस्था एवढी होती की सायंकाळी ५.१० वाजता सुटणारी विदर्भ एक्स्प्रेस रद्द झाली की नाही याची माहिती दुपारी २ पर्यंत प्रवाशांना मिळालेली नव्हती. त्यामुळे तिकीट रद्द करावे की कायम ठेवावे, असा प्रश्न प्रवाशांना पडला होता. काही प्रवासी तर वेटिंग रुममध्ये तासन्तास गाड्यांची वाट पाहत बसले होते.
ट्रेन रद्दची सूचना दिली : सिबल
गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस रद्द झाली आहे का, याची माहिती घेण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांची दुपारी संपर्क केला असता ते म्हणाले, दुपारी २.३० च्या सुमारास दपूमरे झोनकडून ट्रेन रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे. मध्य रेल्वे झोनकडून दपूमरे झोनला ही माहिती उशिरा मिळाल्यामुळे मंडळ प्रशासनाला याबाबत उशिरा माहिती झाले. यामुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाबाबत त्यांनी खेद व्यक्त केला.
ट्रेन रद्द करण्याचा निर्णय मुंबईहून : मिश्रा
मध्य रेल्वे, नागपूर मंडळाचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक कुश किशोर मिश्रा म्हणाले, ट्रेन रद्द करण्याचा निर्णय झोन मुख्यालयातूनच (मुंबई) घेतला जातो. ट्रेन रद्द केल्याची माहिती मिळताच नागपूर स्टेशनवर विशेष बूथ लावून व लाऊड स्पीकरवरून घोषणा करून प्रवाशांना माहिती दिली जाते. ज्या प्रवाशांनी रिझर्व्हेशन फॉर्मवर आपले मोबाईल नंबर नोंदविले आहेत त्यांना मोबाईलवर ट्रेन रद्द झाल्याची माहिती दिली जात आहे.
प्रवाशांची अशी झाली गैरसोय
रेलयात्री आनंद सुखदेवे यांना मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये भरती आपल्या एका परिचित व्यक्तीला भेटण्यासाठी विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला जायचे होते. त्यांनी स्लीपर क्लासचे तिकीट काढले होते. त्यांचा पीएनआर नंबर ६५०५४०२४४ होता. त्यांना फोनवर संबंधित गाडीची योग्य माहिती मिळत नव्हती. त्यामुळे ते स्टेशनवर पोहचले. तेव्हा त्यांना ट्रेन रद्द झाल्याचे कळले. त्यामुळे निराश होऊन घरी परतावे लागले. देवीदास गाडेकर यांना कार्यालयीन कामासाठी मुंबईला जायचे होते. त्यांनी नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसच्या स्लीपर क्लासचे तिकीट काढले होते. त्यांचा पीएनआर नंबर ८३६२८५४२२० होता. ट्रेन रद्द झाल्याची पूर्वसूचना त्यांना मोबाईलवर मिळालीच नाही. स्टेशनवर पोहचल्यावर रद्द झाल्याचे कळले. यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: Will the train be canceled? .. Passengers do not know!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.