हा गहू जनावरे तरी खातील का? निकृष्ट गव्हाचा रेशन दुकानात पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 10:34 PM2020-10-23T22:34:18+5:302020-10-23T22:35:41+5:30

Inferior wheat ration shop supply, Nagpur news शहरातील रेशनच्या दुकानात आलेला गहू जनावरे तरी खातील का? या दर्जाचा आहे. मोफत अथवा कमी किमतीच्या नावावर जनतेला काहीही खाऊ घालायचे का, असा आरोप रेशन कार्डधारकांनी केला आहे.

Will this wheat be eaten by animals? Inferior wheat ration shop supply | हा गहू जनावरे तरी खातील का? निकृष्ट गव्हाचा रेशन दुकानात पुरवठा

हा गहू जनावरे तरी खातील का? निकृष्ट गव्हाचा रेशन दुकानात पुरवठा

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : शहरातील रेशनच्या दुकानात आलेला गहू जनावरे तरी खातील का? या दर्जाचा आहे. मोफत अथवा कमी किमतीच्या नावावर जनतेला काहीही खाऊ घालायचे का, असा आरोप रेशन कार्डधारकांनी केला आहे.

जुलै महिन्यातसुद्धा अशाच प्रकारच्या खराब गव्हाचा पुरवठा रेशन दुकानदारांना झाला होता. तेव्हा रेशन दुकानदारांनी अन्न पुरवठा अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. या महिन्यातसुद्धा तशाच प्रकारच्या निकृष्ट गव्हाचा रेशन दुकानात पुरवठा झाला आहे. या गव्हाची अवस्था बघितल्यावर जनावरे तरी खातील का, असा प्रश्न पडतो. असा निकृष्ट गव्हाचा पुरवठा का होतो, यासंदर्भात एफसीआयमध्ये काम करणाऱ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारकडून चांगल्याच गव्हाचा पुरवठा होतो. परंतु एफसीआयमधील अधिकारी चांगल्या गव्हाचे पोते फोडून त्यात निकृष्ट गहू टाकून भेसळ करतात. गोदामातील अधिकाऱ्यांनी पोते सिलिंग करण्यासाठी मशीनसुद्धा आणली आहे. एफसीआयच्या गोदामात मोठ्या प्रमाणात निकृष्ट गहू आहे. चांगल्या गव्हात मिसळवून काळाबाजार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 एफसीआयमध्ये कुणालाही परवानगी नाही

एफसीआयचे सरकारी गोदाम असले तरी गोदामात कुणालाही भेटी देता येत नाही. त्याचाच फायदा अधिकारी उचलत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

पांढऱ्या धाग्याचा माल चांगला

सरकारकडून एफसीआयच्या गोदामात येणाऱ्या पोत्याला पांढऱ्या रंगाचे सिलिंग असते. हे सिलिंग फाडून त्यात निकृष्ट गहू टाकला जातो. गोदामात सिलिंग मशीनद्वारे पोते सील करण्यात येते. पांढऱ्या धाग्याचे सिलिंग असलेल्या पोत्यातील धान्य चांगले असते. इतर रंगाच्या धाग्याचे सिलिंग असलेल्या पोत्यातील माल निकृष्ट असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: Will this wheat be eaten by animals? Inferior wheat ration shop supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.