‘विंग्ज आॅफ सक्सेस’ : आदित्य डोकवाल, राधा ठेंगडी, निधी सूचक शाखानिहाय ‘टॉपर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:57 AM2018-05-31T00:57:08+5:302018-05-31T01:02:58+5:30
बुधवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. वाणिज्य, कला शाखांमध्ये मुलींनीच पहिला क्रमांक पटकावला आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दात गुणवंतांचे कौतुक सुरू होते. बारावीच्या निकालाने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांच्या पंखांना नवे बळ मिळाले असून अनेक ठिकाणी यशाचे ‘सेलिब्रेशन’ दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुधवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. वाणिज्य, कला शाखांमध्ये मुलींनीच पहिला क्रमांक पटकावला आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दात गुणवंतांचे कौतुक सुरू होते. बारावीच्या निकालाने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांच्या पंखांना नवे बळ मिळाले असून अनेक ठिकाणी यशाचे ‘सेलिब्रेशन’ दिसून आले.
विज्ञान शाखेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य डोकवाल (९८ टक्के) याने नागपूरसह विदर्भात अव्वल क्रमांक पटकाविला. त्याच्यापाठोपाठ त्याच महाविद्यालयाचा योगेंद्र हुमने (९७.५४ टक्के) हा दुसरा क्रमांकावर राहिला. तिसऱ्या क्रमांकावर सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी अनमोल अरोडा (९७.४० टक्के) हा आहे.
वाणिज्य शाखेत सी.बी.आदर्श विद्यामंदिरची विद्यार्थिनी निधी सूचक हिने ९६.३० टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सोनल भट व श्रेया दांडेकर या दोघी ९५.३८ टक्के गुणांसह संयुक्तपणे दुसºया क्रमांकावर राहिल्या. याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी भार्गवी वनकर हिने ९५.२३ टक्के गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला आहे.
कला शाखेतदेखील मुलींचाच वरचष्मा असून ‘एलएडी’ महाविद्यालयाच्या राधा ठेंगडी हिने ९७ टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक मिळविला आहे. याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी अनन्या आचार्य हिने ९३ टक्के गुण प्राप्त करत दुसरा क्रमांक पटकाविला तर हिस्लॉप महाविद्यालयाची विद्यार्थिनी जुही चौधरी ही ९२ टक्के गुणांसह तृतीय क्रमांकावर राहिली.
विभाग, जिल्ह्यात विद्यार्थिनींचीच बाजी
नागपूर विभागातून ८१,११२ पैकी ७३,८१४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होणाºयांचे प्रमाण ८४.२४ टक्के इतके आहे. नागपूर जिल्ह्याच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर ३१,६७९ पैकी २९,५२७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९३.२१ टक्के इतके आहे. गेल्या वर्षापेक्षा ही आकडेवारी १.३९ टक्क्यांनी अधिक आहे. नागपूर जिल्ह्यातून ८६.३३ टक्के मुले उत्तीर्ण झाली. संपूर्ण जिल्ह्याचा एकूण निकाल ८९.७२ टक्के इतका राहिला.
विज्ञान शाखा
१ आदित्य डोकवाल डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय ९८.०० %
२ योगेंद्र हुमने डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय ९७.५४ %
३ अनमोल अरोडा सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय ९७.४० %
वाणिज्य शाखा
१ निधी सूचक सी.बी.आदर्श विद्यामंदिर ९६.३० %
२ सोनल भट डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय ९५.३८ %
२ श्रेया दांडेकर डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय ९५.३८ %
३ अंजू थॉमस जी.एस.वाणिज्य महाविद्यालय ९५.२३ %
कला शाखा
१ राधा ठेंगडी एलएडी महाविद्यालय ९७.०० %
२ अनन्या आचार्य एलएडी महाविद्यालय ९३.०० %
३ जुही चौधरी हिस्लॉप महाविद्यालय ९२.०० %
नागपूर जिल्ह्यातील उत्तीर्णांची टक्केवारी
सहभागी उत्तीर्ण टक्केवारी
विद्यार्थी ३२,५०४ २८,०६१ ८६.३३
विद्यार्थिनी ३१,६७९ २९,५२७ ९३.२१
एकूण ६४,१८३ ५७,५८८ ८९.७२
उपराजधानीतील उत्तीर्णांची टक्केवारी
सहभागी उत्तीर्ण टक्केवारी
विद्यार्थी १९,८६३ १७,५८८ ८८.५५
विद्यार्थिनी १९,७८४ १८,६५८ ९४.९७
एकूण ३९,६४७ ३६,२४६ ९१.४२