पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:07 AM2021-07-03T04:07:16+5:302021-07-03T04:07:16+5:30

भिवापूर : कृषी विभागाच्या वतीने रबी हंगाम पीक स्पर्धा घेण्यात आली होती. यात तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजी मारली आहे. विभागस्तरावर ...

The winners of the crop competition were felicitated | पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार

पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार

Next

भिवापूर : कृषी विभागाच्या वतीने रबी हंगाम पीक स्पर्धा घेण्यात आली होती. यात तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजी मारली आहे. विभागस्तरावर सुनील चिंचुलकर, राजू वांगे, तर जिल्हास्तरावर अमित राऊत रा. महालगाव यांची निवड झाली. तालुकास्तरावरसुद्धा शेतकरी चमकले. कृषी दिनाचे औचित्य साधत या विजेत्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कृषी दिन कार्यक्रमाला सभापती ममता शेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी पी. एन. डाखळे, गटविकास अधिकारी माणिक हिमाने, कृष्णा घोडेस्वार, तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे, मंडळ कृषी अधिकारी श्याम गिरी, प्रगतशील शेतकरी डॉ. नारायण लांबट आदी प्रामुख्याने उपस्थित होते. गत आठवडाभरापासून तालुक्यात सुरू असलेल्या कृषी संजीवनी सप्ताहाचा यावेळी समारोप करण्यात आला. विभाग व जिल्हास्तरीय पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार उपराजधानीत आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. तर तालुकास्तरीयपीक स्पर्धेतील हरभरा पिकाकरिता सर्वसाधारण गटातील पुरस्कार विजेते शेतकरी विजय कारमोरे रा. बोटेझरी, पितांबर तलमले रा. अड्याळ, उदय बालपांडे रा. बोटेझरी तर गहूपीक सर्वसाधारण गटातून अतुल मून, नाना भोयर, अल्का भोयर सर्व रा. महालगाव यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी स्पर्धा आणि पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्यापीक पद्धतीवर प्रकाश टाकत त्यांचे कौतुक केले. शेतकऱ्यांनीसुद्धा मनोगत व्यक्त करताना घेतलेल्यापीक पद्धत लागवडीची माहिती दिली. यावेळी अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

020721\img-20210702-wa0069.jpg

पुरस्कार प्राप्त शेतक-याचा सत्कार करतांना मान्यवर

Web Title: The winners of the crop competition were felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.