हिवाळी अधिवेशनातील मोर्चे ठरू शकतात ‘कोरोना कॅरिअर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 11:38 AM2020-10-13T11:38:44+5:302020-10-13T11:39:05+5:30
Corona Nagpur News हिवाळी अधिवेशनात मोचेर्देखील ‘कोरोना कॅरिअर’ ठरु शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिवाळी अधिवेशनात प्रश्नांवर खरोखरच किती चर्चा होते व न्याय मिळतो हा संशोधनाचा विषय असला तरी मोर्चेकऱ्यांमध्ये मोठा उत्साह असतो. कोरोना कालावधीत मोर्चांना परवानगी देण्यात येणार आहे. अशा स्थितीत गदीर्चे नियंत्रण करण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर राहणार आहे. हे मोचेर्देखील ‘कोरोना कॅरिअर’ ठरु शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अधिवेशनाच्या निमित्ताने बंदोबस्तासाठी राज्यभरातून पोलीस नागपुरात येत असतात. अनेकदा त्यांना दाटीवाटीनेच रहावे लागते. एकूण सुविधा लक्षात घेता कोरोना काळात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ राखणे हे पोलिसांसाठीदेखील मोठे आव्हान ठरणार आहे. विशेषत: अनेक पोलिसांची व्यवस्था ही पोलीस लाईन टाकळी येथे करण्यात येते. अशात एखादा जरी पोलीस कोरोनाबाधित निघाला तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
मोर्चकऱ्यांनादेखील धोका
विविध मागण्यांसाठी अधिवेशनावर मोर्चा काढणारे मोर्चेकरी हेदेखील राज्याच्या विविध भागांतून येतात. अनेकदा ते खचाखच भरलेल्या खासगी वाहनांतून येतात. मोर्चांमुळे सीताबर्डी, टेंपल बाजार मार्ग, सदर, यशवंत स्टेडियम या परिसरात गर्दी होते. डिसेंबरपर्यंत कोरोना जाणे अशक्य असल्याचे डॉक्टर्सचे म्हणणे आहे. अशा स्थितीत मोर्चेकरी फिजिकल डिस्टन्सिंग पाळतात की नाही, मास्क लावतात की नाही याकडे कुणाचेही लक्ष राहणार नाही. यामुळे मोर्चकऱ्यांदेखील संसगार्चा धोका होऊ शकतो.