हिवाळी अधिवेशन २०१९; थकीत कर्ज माफीच्या घोषणेने अधिवेशनाचे सूप वाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 05:13 PM2019-12-21T17:13:40+5:302019-12-21T17:18:05+5:30

राज्याच्या निवनियुक्त १४ व्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी नागपुरात सूप वाजले.

Winter session 2019; Winter session is concluded | हिवाळी अधिवेशन २०१९; थकीत कर्ज माफीच्या घोषणेने अधिवेशनाचे सूप वाजले

हिवाळी अधिवेशन २०१९; थकीत कर्ज माफीच्या घोषणेने अधिवेशनाचे सूप वाजले

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये ते मंत्रिमंडळाचा विस्तारादरम्यान असलेल्या अनेक सामाजिक, राजकीय व आर्थिक मुद्यांवर चौफेर चर्चा झडलेले राज्याच्या निवनियुक्त १४ व्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी नागपुरात सूप वाजले.
महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या या सरकारकडून जनतेला असलेल्या अपेक्षा, विरोधकांचे आक्रमक पवित्रे आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबतचा नागरिकांमधला रोष अशा गदारोळात अधिवेशनाचे पाच दिवस गाजत राहिले.
यंदाचे अधिवेशन केवळ पाचच दिवस राहणार असल्याचे आधीच जाहीर झाले असल्याने या अधिवेशनाकडून तशाही फारशा अपेक्षा जनतेला नव्हत्या. मात्र शेतकºयांना मदत मिळेल व त्याद्वारे थोडाफार दिलासा मिळेल असे वाटत होते.
केंद्राने जारी केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबतचा जनमानसातला संभ्रम व रोष देशभरात तीव्र होत असताना त्याचे पडसाद या अधिवेशनातही उमटलेले दिसले. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षातील नेत्यांनी यावर प्रकाश टाकलेला दिसला.
अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने कंबरडे मोडलेल्या राज्यातील शेतकºयांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.  राज्यातील शेतकºयांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे नाव या योजनेला देण्यात आले आहे.

Web Title: Winter session 2019; Winter session is concluded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.