Winter Session Maharashtra : आमच्याकडे शिंदे-फडणवीस सरकारचे ४० घोटाळे; 'बॉम्ब'च्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांचा नवा धमाका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 11:41 AM2022-12-28T11:41:03+5:302022-12-28T11:45:36+5:30

गेल्या ८ दिवसांपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात जमीन घोटाळ्यावरुन विरोधी पक्षांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Winter Session Maharashtra We have 40 scams of Shinde-Fadnavis government says Sanjay Raut | Winter Session Maharashtra : आमच्याकडे शिंदे-फडणवीस सरकारचे ४० घोटाळे; 'बॉम्ब'च्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांचा नवा धमाका

Winter Session Maharashtra : आमच्याकडे शिंदे-फडणवीस सरकारचे ४० घोटाळे; 'बॉम्ब'च्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांचा नवा धमाका

googlenewsNext

गेल्या ८ दिवसांपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे.  अधिवेशनात जमीन घोटाळ्यावरुन विरोधी पक्षांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. खासदार संजय राऊत यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर घोटाळ्याचे आरोप करत टीका केली.  

'महाराष्ट्रात भविष्यात राजकीय परिवर्तन मोठ्या होणार आहेत. या संदर्भात पाऊलं पडत आहेत, शिवसेनेच्या नेतृत्वात ही क्रांती होणार आहे. समाजातील राजकीय घटक एकत्र येत आहेत, वंचित बहुजन आघाडीचाही यात समावेश आहे. या संदर्भातील माहिती तुम्हाला पक्ष  प्रमुख देतील, असंही खासदार संजय राऊत म्हणाले. ( Winter Session Maharashtra)

राज ठाकरेंच्या खुर्चीमागे वसंत मोरे; 'त्या' किस्स्याची पुण्यात रंगली चर्चा

मुंबईत सर्व देश सामावला आहे, फक्त कर्नाटक नाही. मुंबईती कानडी बांधवांवर अत्याचार होत नाहीत, मुंबईत बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशमधील लोक राहतात, सर्वजण शांततेत राहतात, त्यांच्यावर अत्याचार होत नाहीत. तसे सीमाभागात होते का? सीमाभागात गेली 75 वर्षे मराठी बांधवांवर अत्याचार होत आहेत, त्यामुळे आधी सीमाभाग केंद्रशासीत होईल, असंही संजय राऊत म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकारमधील फक्त शिंदे गटातील मंत्र्यांची प्रकरणे बाहेर येत आहेत. सगळी प्रकरणे गंभीर आहेत, काही लोक म्हणत आहेत कुठे बॉम्ब फुटतोय, हे काय आहे. हे फक्त टोकन आहेत अजून मोठे बॉम्ब आहेत. एनआयटी घोटाळा, संजय राठोड यांचा जमिनीचा भ्रष्टाचार, अब्दुल सत्तार यांची कलेक्शनगिरी, उद्योगमंत्र्यांच प्रकरण, अनेक प्रकरणे आमच्याकडे आहेत. ही प्रकरणे आम्हाला देणारे तुमचे सहकारी आहेत, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला. 

हा भ्रष्टाचाराचा वेताळ घेऊन फिरण देवेंद्र फडणवीस यांना ओझ झाले असेल, महाराष्ट्रात भाजप बदनाम होत आहे. महाराष्ट्रात भ्रष्ट मंत्र्यांनी चालवलेले हे सरकार आहे. ४० आमदार आणि मंत्र्यांचे घोटाळे बाहेर येणार आहेत, असंही संजय राऊत म्हणाले. 

हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे, या सरकारमध्ये प्रमाणीकपणा नाही.  हे ४० आमदार अपात्र ठरणार आहेत. शिवसेनेच्या आमदारांना सभागृहात बोलू दिले जात नाही. विधानसभा अध्यक्ष पक्षपातपणा करत आहेत. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. 

Web Title: Winter Session Maharashtra We have 40 scams of Shinde-Fadnavis government says Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.