बेळगाव निपाणीचा सीमावर्ती भाग केंद्रशासित करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 09:40 IST2024-12-19T09:39:56+5:302024-12-19T09:40:23+5:30
गेल्या ७० वर्षांपासून सीमावर्ती भागाचा मुद्दा गाजत आहे.

बेळगाव निपाणीचा सीमावर्ती भाग केंद्रशासित करा
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने बुधवारी केली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या वकिलांसोबत या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने सीमासमन्वयक मंत्री नेमण्यात यावे, याकडेही समितीने सरकारचे लक्ष वेधले आहे.
गेल्या ७० वर्षांपासून सीमावर्ती भागाचा मुद्दा गाजत आहे. या भागातील ८६५ गावांमध्ये ७० टक्के लोकसंख्या मराठी भाषकांची आहे.