वीजेच्या झटक्याने खांबावरच वायरमेनचा मृत्यू
By दयानंद पाईकराव | Updated: May 23, 2024 17:18 IST2024-05-23T17:17:47+5:302024-05-23T17:18:24+5:30
पत्नी अन् दोन लहान मुलांवर दुखाचा डोंगर : नवीन कामठी ठाण्यांतर्गत घटना

Wireman died on pole due to electric shock
नागपूर :वीजेचा झटका लागल्यामुळे खांबावरच एका वायरमनचा मृत्यू झाला. ही घटना नविन कामठी पोलिस ठाण्यांतर्गत बुधवारी दुपारी १२.०५ वाजताच्या सुमारास घडली.
भारत रामभाऊ वईले (३२, रा. जुनी कामठी कन्हान) असे मृत्यू झालेल्या वायरमनचे नाव आहे. ते नविन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सईदनगर, कामठी रोड, मोरबी टाईल्स समोर इलेक्ट्रीकच्या खांबावर चढून वायर दुरुस्ती करीत होते. अचानक त्यांना वीजेचा धक्का लागला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना खाली उतरवून उपचारासाठी कामठीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी त्यांच्या सोबत काम करणारे मोहम्मद सईद मोहम्मद इसाक सेय्यद (५८, रा. सईदनगर कामठी) यांनी दिलेल्या सुचनेवरून नविन कामठी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे.
पत्नी अन् मुलांवर दुखाचा डोंगर
वीजेच्या खांबावर वायरची दुरुस्ती करताना वीजेचा धक्का लागून मृत्यू झालेले भारत वईले यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. कुटुंबात ते एकटेच कमावते व्यक्ती होते. अचानक त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.