कोरोनाच्या सक्रिय रुग्ण शंभरीच्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:10 AM2021-08-19T04:10:58+5:302021-08-19T04:10:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनेक महिन्यानंतर जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या शंभरच्या खाली आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९९ सक्रिय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक महिन्यानंतर जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या शंभरच्या खाली आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९९ सक्रिय रुग्ण आहेत. बुधवारी जिल्ह्यात चार नवे बाधित आढळले. ग्रामीणमध्ये एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. विशेष म्हणजे सलग सहाव्या दिवशी एकही मृत्यू नोंदविल्या गेला नाही.
बुधवारच्या अहवालानुसार, शहरात चार रुग्ण आढळले व एकूण रुग्णसंख्या ४ लाख ९२ हजार ९७८ वर गेली. आतापर्यंत शहरात ३ लाख ४० हजार ३९ तर ग्रामीणमध्ये १ लाख ४६ हजार १२३ रुग्ण आढळले. जिल्ह्यात मृत्यूची संख्या १० हजार ११८ वर स्थिर आहे.
बुधवारी जिल्ह्यात ४ हजार ८२१ चाचण्या झाल्या. त्यात शहरातील ३ हजार ७९५ व ग्रामीणमधील १ हजार २६ चाचण्यांचा समावेश होता. बुधवारी जिल्ह्यातील एकूण सात रुग्ण बरे झाले. यात शहरातील पाच व ग्रामीणमधील एक रुग्ण होता.
५० जण रुग्णालयात दाखल
९९ सक्रिय रुग्णांपैकी ५० जण विविध रुग्णालयांमध्ये दाखल आहेत, तर ४९ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ४ लाख ८२ हजार ७६१ इतकी झाली आहे.
कोरोनाची बुधवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ४,८२१
शहर : ४ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ० रुग्ण व ० मृत्यू
एकूण बाधित रुग्ण :४,९२,९७८
एकूण सक्रिय रुग्ण : ९९
एकूण बरे झालेले रुग्ण : ४,८२,७६१
एकूण मृत्यू : १०,११८