ग्रामीण भागाच्या कणा आधाराविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:21 AM2020-12-04T04:21:59+5:302020-12-04T04:21:59+5:30
नागपूर : शेतकरी व ग्रामीण भागाचा कणा असलेल्या कृषी व पशुसंवर्धन विभागाचे विभाग प्रमुखांचे पद रिक्त असल्यामुळे या विभागाच्या ...
नागपूर : शेतकरी व ग्रामीण भागाचा कणा असलेल्या कृषी व पशुसंवर्धन विभागाचे विभाग प्रमुखांचे पद रिक्त असल्यामुळे या विभागाच्या योजना राबविण्यास अडचण निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी हे पद जानेवारी २०२० पासून रिक्त आहे. या पदावर कार्यरत असलेले प्रवीण देशमुख यांची मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे विशेष कार्य अधिकारी पदावर बदली झाली आहे. सध्या विविन लोहोट हे अतिरिक्त प्रभार सांभाळीत आहेत. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी हे पद डॉ. अरविंद ठाकरे हे जुलै २०२० अखेर सेवानिवृत्त झाल्यापासून रिक्त आहे. या पदाचा अतिरिक्त प्रभार डॉ. निरंजन शेटे पाहत होते, परंतु ते वैद्यकीय रजेवर गेल्यामुळे सध्या डॉ. युवराज केने हे अतिरिक्त प्रभार सांभाळीत आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बऱ्याच योजना राबविण्यात येतात. कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने योजना राबविण्यास अडचणी येत आहे. अधिकारीच नसल्यामुळे विभागाचे सभापती सुद्धा हतबल आहे.