मागण्यांच्या पूर्ततेशिवाय संप मागे घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:28 AM2017-10-16T00:28:39+5:302017-10-16T00:28:50+5:30

एसटी कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पदनिहाय वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारण्यात येत असून...

Without the fulfillment of the demands will not take off | मागण्यांच्या पूर्ततेशिवाय संप मागे घेणार नाही

मागण्यांच्या पूर्ततेशिवाय संप मागे घेणार नाही

Next
ठळक मुद्देजयप्रकाश छाजेड : अध्यापक भवनात विशेष सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसटी कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पदनिहाय वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारण्यात येत असून मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय हा संप मागे घेणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स कॉंग्रेसचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी केले.
महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेसच्या अध्यापक भवन येथे आयोजित विदर्भ विभागीय मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मेळाव्यात संघटनेचे महासचिव मुकेश तिगोटे यांनी एस. टी. तील कामगारांना देशातील सर्व महामंडळ आणि शासकीय समकक्ष पदांच्या कर्मचाºयांपेक्षा अत्यंत कमी वेतन मिळत असल्यामुळे कामगार आत्महत्या करीत असल्याचे सांगितले.
एस. टी. महामंडळ भ्रष्टाचारामुळे तोट्यात गेले असून वेळीच भ्रष्टाचार न थांबल्यास महामंडळ बंद होण्याची शंका त्यांनी उपस्थित केली. सभेला राज्य उपाध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी, प्रमोद गुंडतवार, प्रादेशिक सचिव अरुण भागवत, राज्य प्रसिद्धीप्रमुख सुभाष गोजे, विभागीय अध्यक्ष डी. डी. महाजन, विभागीय सचिव सुनील राठोड यांच्यासह विदर्भातील पदाधिकारी उपस्थित होते.
प्रास्ताविक अरुण भागवत यांनी केले. संचालन सुभाष गोजे यांनी केले. आभार सुनील राठोड यांनी मानले.

Web Title: Without the fulfillment of the demands will not take off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.