संशोधनाशिवाय देशाचा विकास अशक्य
By Admin | Published: June 25, 2014 01:22 AM2014-06-25T01:22:46+5:302014-06-25T01:22:46+5:30
भारताची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. ही वाटचाल अधिक प्रशस्त करण्यासाठी आपल्याला संशोधनावर भर द्यावा लागेल. जागतिक स्तरावर भारताला वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांमधील
कुलगुरू अरुण जामकर : ‘आय ४ सी’ चे उद्घाटन
नागपूर : भारताची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. ही वाटचाल अधिक प्रशस्त करण्यासाठी आपल्याला संशोधनावर भर द्यावा लागेल. जागतिक स्तरावर भारताला वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती वाढवावी लागेल. संशोधनाशिवाय देशाचा विकास अशक्य असल्याचे मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी व्यक्त केले.
संशोधनाचा फायदा लोकांना मिळवून देण्याचे कार्य ‘आय ४ सी’ तर्फे करण्यात येते. हे केंद्र स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय व रुग्णालयात सुरू करण्यात आले आहे. केंद्राचे उद्घाटन डॉ. अरुण जामकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. महेशकुमार येन्की, संस्थेचे अध्यक्ष शरद काळमेघ, विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य डॉ. मिलिंद देशपांडे, आर. एम. सिंग, गंगाधर वकील, हेमंत काळमेघ, दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अर्शद सय्यद आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘१२ सी’ या स्पर्धेतील विजेत्यांना अतिथींच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमाला शहरातील विविध संस्थेचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)