विमानात महिलेने बेल्टमधून आणले १.२५ किलो सोने; कस्टम विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 05:38 AM2023-10-07T05:38:53+5:302023-10-07T05:39:05+5:30
सोने खास बनवलेल्या बेल्टमध्ये पेस्ट स्वरूपात लपवून आणले होते.
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पहाटे एअर अरेबियाच्या विमानातील एका महिला प्रवाशाकडून १.२५ किलोहून अधिक सोने जप्त करण्यात आले. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. हे सोने खास बनवलेल्या बेल्टमध्ये पेस्ट स्वरूपात लपवून आणले होते.
मुंबईची रहिवासी असलेली ३५ वर्षीय रेश्मा शारजाहून एअर अरेबिया फ्लाइट जी-९-४१५ ने नागपूरला पोहोचली होती; परंतु कस्टम ड्यूटी वाचवून सोने तस्करी करून घेऊन जाण्याचा तिचा प्रयत्न नागपूर विमानतळावर यशस्वी होऊ शकला नाही. महिला प्रवाशाला संशयास्पद स्थितीत पाहून अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली असता तिच्या पट्ट्यात पेस्ट स्वरूपात १.२७० किलो २४ कॅरेट शुद्ध सोने आढळले. हा पट्टा खास सोन्याच्या तस्करीसाठी बनवल्याचे सांगण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ७२.२९ लाख रुपये इतकी आहे.