कूलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का, महिलेचा मृत्यू

By योगेश पांडे | Published: April 19, 2023 05:23 PM2023-04-19T17:23:59+5:302023-04-19T17:24:34+5:30

हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

Woman dies of electrocution while pouring water into cooler | कूलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का, महिलेचा मृत्यू

कूलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का, महिलेचा मृत्यू

googlenewsNext

नागपूर : कूलरमध्ये पाणी टाकताना वीजेचा शॉक लागून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. कुसूम महादेव चावलकर (७२, सच्चिदानंद नगर) असे मृतक महिलेचे नाव आहे.

१८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्या घरच्या कूलरमध्ये पाणी टाकत होत्या. कूलरची वायर प्लगला लागली असल्याने त्यांना वीजेचा जोरदार शॉक बसला. त्या बेशुद्ध झाल्या. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी मेडिकल इस्पितळात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नागपुरात उन्हाचा कडाका वाढत असताना घरोघरी कूलरचा वापर सुरू झाला आहे. अशा स्थितीत पाणी टाकताना किंवा कूलरला हात लावला असताना शॉक लागण्याची शक्यता असते. दरवर्षी अशी प्रकरणे घडत असतात. त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Woman dies of electrocution while pouring water into cooler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.