महिला डॉक्टरला शिवीगाळ, मेडिकलमध्ये नातेवाईकाचा गोंधळ
By admin | Published: July 10, 2017 11:41 PM2017-07-10T23:41:52+5:302017-07-10T23:41:52+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी शासनाने नुकतेच पोलीस सुरक्षा बलाचे रक्षक तैनात केले.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 10 - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी शासनाने नुकतेच पोलीस सुरक्षा बलाचे रक्षक तैनात केले. तर रुग्णालय प्रशासनाने पास सिस्टीम सुरू केली. असे असतानाही, रविवारी रात्री मेडिकलच्या एका निवासी महिला डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईईकांकडून शिवीगाळाच्या प्रकाराला सामोर जावे लागले.
प्राप्त माहितीनुसार, मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्राच्या अपघात विभागात रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास फिनाईल पिलेल्या २० वर्षे वय असलेल्या तरुणाला उपचारासाठी आणले. कोणतीही प्रक्रिया न करता रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याला थेट विभागात दाखल केले. पहिले आमचा रुग्णाची तपासणी करा, अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली. मात्र, त्याचवेळी निवासी डॉक्टर एका गंभीर रुग्णाला तपासत होते. यामुळे नातेवाईकांना थोडावेळ थांबण्यास सांगितले. याला घेऊन रुग्णाच्या नातेवाईकांपैकी एकाने महिला डॉक्टरला शिविगाळ करण्यास सुरुवात केली. डॉक्टरने लगेच याची माहिती सुरक्षा रक्षकांना दिली. त्यानंतर दुसºया दिवशी त्या व्यक्तीला वॉर्डात प्रवेश न देण्याची सूचनाही केली. महिला निवासी डॉक्टरने सूचना देऊनही तो व्यक्ती वॉर्ड नं. २३ मध्ये रुग्णास भेटण्यासाठी आला. यावेळीही त्याने हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. महिला निवासी डॉक्टरने मार्ड सं़घटनेला याची कल्पना दिली. त्यानंतर सुरक्षा रक्षक आणि वॉडार्तील कर्मचा-याच्या मदतीने त्याला पकडले. त्या व्यक्तीविरोधात निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने अजनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देखील केली.
रुग्णासोबत पाच नातेवाईक-
रुग्णासोबत वॉर्डात केवळ दोनच नातेवाईकांना येण्याची परवानगी आहे. मात्र, या घटनेवेळी एका रुग्णासोबत पाच नातेवाईक आत आले. ते कसे आत आले? त्यांना सुरक्षा रक्षकांनी का अडवले नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.