अभियंता युवतीला ब्लॅकमेल करून दोन वर्ष बलात्कार, व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 11:15 AM2022-02-17T11:15:43+5:302022-02-17T11:27:17+5:30

हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, हप्ता वसुली आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

woman engineer blackmailed and repeatedly raped for 2 years | अभियंता युवतीला ब्लॅकमेल करून दोन वर्ष बलात्कार, व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी

अभियंता युवतीला ब्लॅकमेल करून दोन वर्ष बलात्कार, व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी

googlenewsNext
ठळक मुद्देशीतपेयात दिले बेशुद्ध करण्याचे औषध शारीरिक संबंधाचे केले चित्रीकरण

नागपूर : शीतपेयात बेशुद्ध करण्याचे औषध मिसळून अभियंता असलेल्या युवतीवर दोन वर्षांपासून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. वसुली आणि धमकी यामुळे त्रस्त झालेल्या युवतीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, हप्ता वसुली आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

कुणाल दादाराव इंगळे असे आरोपीचे नाव आहे. पीडित ३१ वर्षाची युवती अभियंता आहे. २०१६ मध्ये ती एका कंपनीत मुलाखत देण्यासाठी भोपाळला गेली होती. तेथे तिची कुणालशी भेट झाली. कुणालने तिला आपण अभियंता असल्याचे सांगितले. दोघांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिला. नागपूरला परतल्यानंतर त्यांच्यात बोलणे व्हायचे.

२६ जानेवारी २०१९ रोजी युवती हैदराबादच्या एका कंपनीत मुलाखत देण्यासाठी गेली होती. कुणालही तेथे मुलाखत देण्यासाठी आला होता. दोघे एकाच हॉटेलमध्ये थांबले. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार कुणालने हॉटेलमध्ये तिला शीतपेय पाजले. शीतपेय घेतल्यानंतर तिची शुद्ध हरवली. त्यानंतर कुणालने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे त्याने छायाचित्रीकरणही केले. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेला आपल्यासोबत जबरदस्ती केल्याचा संशय आला. कुणालने तिला व्हिडिओ क्लिप दाखवून तिचा पती आणि आजी-आजोबांना दाखविण्याची धमकी देऊन शांत राहण्यास सांगितले. पती आणि कुटुंबीयांच्या चिंतेमुळे तिने ही बाब कोणालाही सांगितली नाही.

हैदराबादवरून परतल्यानंतर कुणाल तिचे शोषण करू लागला. व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. दरम्यान पीडितेच्या पतीला दिल्लीतील कंपनीत नोकरी लागली. पती दिल्लीला गेल्यानंतर कुणाल आणखीनच बेभान झाला तो पीडितेला हॉटेलसह अनेक ठिकाणी घेऊन गेला. दरम्यान पीडितेच्या मानसिक स्थितीचा फायदा घेऊन कुणाल तिला पैसेही मागू लागला. त्याने पीडितेकडून रोख आणि गुगल पे च्या माध्यमातून २.५० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम वसूल केली. शोषण वाढल्यामुळे पीडित युवती त्रस्त झाली. तिने पतीला आपबिती सांगितली. मंगळवारी पतीसोबत हुडकेश्वर ठाण्यात तिने कुणाल विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. कुणाल सध्या फरार आहे. त्याचे वडील अर्जनविस असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: woman engineer blackmailed and repeatedly raped for 2 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.