अपघातात महिलेचा मृत्यू, तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:13 AM2021-09-08T04:13:06+5:302021-09-08T04:13:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : वेगात असलेल्या ऑटाेवरील चालकाचा ताबा सुटला आणि ऑटाे दुभाजकावर धडकला. यात ऑटाेतील महिलेचा मृत्यू ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : वेगात असलेल्या ऑटाेवरील चालकाचा ताबा सुटला आणि ऑटाे दुभाजकावर धडकला. यात ऑटाेतील महिलेचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. सर्व जण एकाच कुटुंबातील आहेत. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) शहरात रविवारी (दि. ५) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
भगवानदेवी लखनसिंग गुजर (६०) असे मृत महिलेचे नाव असून, देवीसिंग लखनसिंग गुजर (२६), मायादेवी गुजार व कान्हा गुजर, सर्व रा. जीआरसी एरिया, कन्हान, ता. पारशिवनी अशी जखमींची नावे आहेत. या सर्वांनी खरेदी केलेले साहित्य एमएच-४९/एआर-१६२० क्रमांकाच्या ऑटाेत ठेवले व याच ऑटाेत बसून घराकडे जायला निघाले. मध्येच ऑटाेचालक सुधीर याचा वाहनावरील ताबा सुटला आणि ऑटाे दुभाजकावर धडकला.
यात चाैघेही जखमी झाले. मात्र, भगवानदेवी यांच्या डाेके व मानेला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून भगवानदेवी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कन्हान येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात पाठविला तर उर्वरित तिघांना उपचारासाठी कामठी शहरातील मिलिटरी हाॅस्पिटलमध्ये भरती केले. यातील देवीदास व कान्हा यांना सुटी देण्यात आली असून, मायादेवी यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी ऑटाेचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक जावेद शेख करीत आहेत.