अन् त्यांनी धावत्या ऑटोत केली लाखोंची चोरी, 'अशी' घडली घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 05:40 PM2021-11-09T17:40:03+5:302021-11-09T17:51:58+5:30

भाऊबिजेला निघालेल्या महिलेच्या पर्समधील पावणेदोन लाख रुपयांचे दागिने तीन चोरट्या महिलांनी धावत्या ऑटोत लंपास केले. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात या प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

woman loss worth 2 lakhs of jewellery while travelling in auto | अन् त्यांनी धावत्या ऑटोत केली लाखोंची चोरी, 'अशी' घडली घटना

अन् त्यांनी धावत्या ऑटोत केली लाखोंची चोरी, 'अशी' घडली घटना

Next
ठळक मुद्देसोबत बसलेल्या महिलांची हातचलाखी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भाऊबिजेला निघालेल्या महिलेच्या पर्समधील पावणेदोन लाख रुपयांचे दागिने तीन चोरट्या महिलांनी धावत्या ऑटोत लंपास केले. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात या प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

गोविंद प्रभू नगरातील रहिवासी कविता अनिल कारेमोरे (वय२९) यांचे पवनीला माहेर आहे. ६ नोव्हेंबरला दुपारी २ च्या सुमारास भाऊबिजेसाठी त्या माहेरी जाण्यासाठी निघाल्या. सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास परत आल्या. गणेशपेठ बसस्थानक ते राजापेठ बसथांब्यादरम्यान ज्या ऑटोत त्या आल्या. त्याच ऑटोत आणखी तीन महिला बसल्या होत्या. त्यांनी कविता यांची पर्स बेमालूमपणे उघडली अन् त्यातील १ लाख, ६८ हजारांचे सोन्याचांदीचे दागिने चोरले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कविता यांनी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. ऑटोच्या आधारे पोलीस त्या चोरट्या महिलांचा शोध घेत आहेत.

सणावाराच्या निमित्ताने दागदागिने घालणं कुणालाही आवडेल मात्र, गर्दीच्या ठिकाणी चोरटे कधी हे दागिने लंपास करतील याचा अंदाजही आपल्याला येणार नाही. त्यामुळे, वर्दळीच्या ठिकाणी दागदागिने वापरताना विशेष खबरदारी बाळगावी. गरज नसल्यास दागिने अशा ठिकाणी नेण्याचे, घालण्याचे टाळावे अन्यथा तुम्हाला मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागू शकते.

Web Title: woman loss worth 2 lakhs of jewellery while travelling in auto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.