स्त्री घराचा मुख्य कणा : कांचन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 10:48 PM2018-11-22T22:48:10+5:302018-11-22T22:54:00+5:30
घर कसे सांभाळायचे हे स्त्रीच्या हातात असते. कारण ती घराचा मुख्य कणा आहे, असे मत व्यक्त करत युवा पिढीच्या समस्या जाणून घ्या आणि त्यांना वेळ द्या, असे आवाहन कांचन गडकरी यांनी केले.आयआरसीच्या परिषदेसाठी देशभरातून हजारो पाहुणे आले आहेत. त्या पाहुण्यांच्या पत्नींना परिसरात विरंगुळा मिळावा म्हणून वूमेन कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीचे विविध उपक्रमांचे उद्घाटन कांचन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घर कसे सांभाळायचे हे स्त्रीच्या हातात असते. कारण ती घराचा मुख्य कणा आहे, असे मत व्यक्त करत युवा पिढीच्या समस्या जाणून घ्या आणि त्यांना वेळ द्या, असे आवाहन कांचन गडकरी यांनी केले.
आयआरसीच्या परिषदेसाठी देशभरातून हजारो पाहुणे आले आहेत. त्या पाहुण्यांच्या पत्नींना परिसरात विरंगुळा मिळावा म्हणून वूमेन कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीचे विविध उपक्रमांचे उद्घाटन कांचन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, श्री लोकसेवा जगदंबा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योती बावनकुळे, शारदा बडोले, मीनल येरावार, गौरी जोशी, अनघा सगणे, स्वाती किडे यांचेसह समितीचे अध्यक्ष सुचिता देबडवार, समितीचे उपाध्यक्ष अर्चना नवघरे उपस्थित होते. यावेळी कांचन गडकरी यांनी समाजातील कर्तृत्ववान महिलांचे उदाहरण देत उपस्थितांना प्रेरित केले.
आदिवासी गोंडी संस्कृतीच्या नृत्याने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पाथ ब्रेकिंग आॅफ इंडियन वूमेन या विषयांतर्गत भारतातील प्रेरणादायी महिलांवरील चित्रफित सादर करण्यात आली. कार्यक्रमाला देशभरातील महिला हजर होत्या. त्यांना हळदी कुंकू देत ओटी भरण्यात आली. आनंदी घरडे या चिमुकलीने नृत्य सादर केले.
‘सोनू तुला इंजिनियरवर भरोसा नाही का?
बांधकाम क्षेत्राशी संंबधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जीवन हे अतिशय व्यस्त असते. त्यांच्या जीवनाचे विविध पैलू तसेच रस्त्याच्या बांधकामातून समाजाच्या जीवनात कसे बदल घडून आले. त्यात इंजिनियरची भूमिका कशी महत्त्वाची आहे, हे पटवून देणारे सोनू तुला इंजिनियरवर भरोसा नाही का? या नाटकाद्वारे महिला अधिकारी आणि त्यांच्या पत्नींनी पटवून दिली. गडकरी यांनी स्वत: हे नाटक पाहिले. सुचिता देबडवार, संगीता होतवानी, स्मिता बोरकर, शेफाली कुंदरवार, वैशाली गोडबोले, सीमा देव, पल्लवी उरकुडे, भारती कुंभलकर व क्षिप्रा महाजन आदींचा या नाटकात सहभाग होता.